ठाणे : दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. त्यात कल्याण-डोंबिवली, ठाणे, नवी मुंबई महापालिकांमध्ये कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे बुधवारी जिल्ह्यात बाधित रुग्णांची संख्या एक हजार 325 तर, 33जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली. त्यामुळे जिल्ह्यातील बाधितांची संख्या 34 हजार 649 तर, मृतांची संख्या 1 हजार 97 झाली आहे.
कल्याण डोंबिवली महानगर पालिका क्षेत्रात 350 रुग्णांसह तीन जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे बाधितांची संख्या 6 हजार 925 तर, मृतांची संख्या 123 इतकी झाली आहे. ठाणे महानगर पालिका हद्दीत 366 बाधितांची तर, 14 जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आल्यामुळे बाधितांची संख्या 9 हजार 138 तर, मृतांची संख्या 340 वर गेली आहे. नवी मुंबई महापालिकेत 218 रुग्णांची तर, सहा जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे बाधितांची संख्या 6 हजार 823 तर, मृतांची संख्या 217 वर पोहोचला आहे. भिवंडी महापालिका क्षेत्रात 82 बधीतांसह 3 जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली. त्यामुळे बाधितांची संख्या 2 हजार 23 तर, मृतांची संख्या 112 वर पोहोचली.
त्यात मीरा भाईंदरमध्ये 112 रुग्णांची नोंद करण्यात आल्याने बाधितांची संख्या 3 हजार 438 इतकी झाली आहे. उल्हासनगर 68 रुग्णांची नोंद करण्यात आल्याने बाधितांची संख्या एका हजार 982 झाली आहे. अंबरनाथमध्ये 45 रुग्णांची तर, 6 जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आल्याने बाधितांची संख्या एक हजार 868 तर, मृतांची संख्या 51 झाली आहे. बदलापूरमध्ये 33 रुग्णांची नोंद करण्यात आल्याने बाधितांची संख्या 807 झाली आहे. तर, ठाणे ग्रामीण भागात 51 रुग्णांची तर, एकाच्या मृत्यूची नोंद करण्यात आल्याने बाधितांची संख्या एक हजार 645 तर, मृतांची संख्या 48 वर गेली आहे. या वाढत्या बाधितांच्या संख्येसह वाढत्या मृतांच्या संख्येमुळे जिल्हा प्रशासनासह आरोग्य विभागावरील ताण वाढत आहे.