coronavirus: ठाणे जिल्ह्यात कोरोनाच्या ११४६ रुग्णांची नव्याने वाढ; २८ जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2020 08:15 PM2020-10-12T20:15:33+5:302020-10-12T20:16:44+5:30

Corona News : ठाणे जिल्ह्यात आतापर्यंत एक लाख ९२ हजार ९७१ रुग्णांची नोंद झाली आहे. तर,  आता जिल्ह्यातील मृतांची संख्या चार हजार ८७४ वर गेली आहे. 

coronavirus: 1146 new cases of coronavirus in Thane district; 28 In 24 hour | coronavirus: ठाणे जिल्ह्यात कोरोनाच्या ११४६ रुग्णांची नव्याने वाढ; २८ जणांचा मृत्यू

coronavirus: ठाणे जिल्ह्यात कोरोनाच्या ११४६ रुग्णांची नव्याने वाढ; २८ जणांचा मृत्यू

googlenewsNext

ठाणे - जिल्ह्यात सोमवारी कोरोनाचे एक हजार १४६ रुग्ण नव्याने सापडले असून २८ जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एक लाख ९२ हजार ९७१ रुग्णांची नोंद झाली आहे. तर,  आता जिल्ह्यातील मृतांची संख्या चार हजार ८७४ वर गेली आहे. 

ठाणे शहरात आज ३०७ नवे रुग्ण आढळले आहेत. या शहरात ४१ हजार १६८ रुग्णांची आतापर्यंत नोंद झाली. आज सहा मृत्यू झाल्यामुळे आता मृत्यूची संख्या एक हजार ७२ झाली आहे. कल्याण - डोंबिवली मनपात २२९ रुग्णांची वाढ झाली असून चार मृत्यू झाले आहेत. आतापर्यंत ४६ हजार ४१६ रुग्ण बाधीत झाले. तर, ९०७ मृत्यू झाले आहेत. 

उल्हासनगरमध्ये ३३रुग्ण सापडले आहेत, तर एकाचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत बाधितांची संख्या नऊ हजार ६७३ झाली झाली असून मृतांची संख्या ३१८ झाली आहे.  भिवंडीला २२ बधीत आढळून आले. तर आज एकाचा मृत्यू झाला आहे. आता बाधीत पाच हजार ४८० असून मृतांची संख्या ३२४ झाली आहे. मीरा भाईंदरमध्ये ११४ रुग्णांची तर, पाच मृतांची संख्या नव्याने वाढली. या शहरात आता बाधितांची संख्या २० हजार ५०२ असून मृतांची संख्या ६३९ झाली आहे

अंबरनाथमध्ये नव्याने ३८ रुग्ण आढळले. तर आज तीन मृत्यू झाले आहेत. आत बाधितांची संख्या सहा हजार ७९९ असून, मृतांची संख्या २४७ झाली आहे. बदलापूरमध्ये ३६ रुग्णांची नोंद झाल्यामुळे बाधीत सहा हजार ७४१ झाले आहेत. या शहरात आज एक मृत्यू झाला आहे. त्यामुळे मृत्यूची संख्या ७८ झाली आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागात ७३ रुग्णांची वाढ झाली असून एका जणाचा मृत्यू झाला आहे. आता बाधीत १५ हजार ५५३ आणि मृत्यू ४६६ झाले आहेत.

Web Title: coronavirus: 1146 new cases of coronavirus in Thane district; 28 In 24 hour

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.