- नितिन पंडीत
भिवंडी - भिवंडीत कोरोनाचा धोका तूर्तास कमी असला तरी प्रशासनाने कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यास सुरुवात केली आहे . भिवंडी शार परिसरात २३ फेब्रुवारी ते ३ मार्च या एका आठवड्याच्या कालावधीत विना मास्क फिरणाऱ्या तब्बल २७२ जणांवर मनपा व पोलीस प्रशासनाने दंडात्मक कारवाई करून सुमारे १ लाख ३६ हजार रुपयांची दंड वसुली केली असल्याची माहिती भिवंडी मनपा प्रशासनाकडून देण्यात आली आहे . तर बुधवारी एकाच दिवसात मास्क न वापरणाऱ्या वीस जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली असून त्यांच्याकडून १० हजार रुपयांची दंड वसुली करण्यात आली आहे . (Action taken against 272 people in Bhiwandi for not wearing mask in a week; 1 lakh 36 thousand fine recovered)
भिवंडी मनपाच्या प्रभाग समिती एक मध्ये भोईवाडा पोलीस ठाण्याच्या अंतर्गत एका आठवड्यात मास्क न वापरणाऱ्या ६४ जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली असून त्यांच्याकडून ३२ हजार रुपयांची दंड वसुली करण्यात आली असून प्रभाग समिती दोन मध्ये भिवंडी शहर पोलिसांनी ३७ जणांवर कारवाई करून १८ हजार ५०० रुपये दंड वसुली केली आहे . प्रभाग समिती तीन मध्ये निजामपुरा पोलीस ठाण्याअंतर्गत ७१ जणांवर कारवाई करण्यात आली असून त्यांच्याकडून ३५ हजार ५०० रुपयांची दंडवसुली करण्यात आली आहे .प्रभाग समिती चार मध्ये शांतीनगर पोलीस ठाण्याअंतर्गत ५२ जणांवर कारवाई करण्यात आली असून त्यांच्याकडून २६ हजार रुपयांची दंड वसुली करण्यात आली असून प्रभाग समिती क्रमांक पाच मध्ये नारपोली पोलीस ठाण्याअंतर्गत ४८ जणांवर कारवाई करण्यात आली असून त्यांच्याकडून २४ हजार रुपयांची दंड वसुली करण्यात आली आहे . अशा प्रकारे एका आठवड्यात महापालिका व पोलीस प्रशासनाकडून कोरोना नियमांचे उल्लंघन करून मास्क न वापरणाऱ्या २७२ जणांवर कारवाई करण्यात आली असून त्यांच्याकडून १ लाख ३६ हजार रुपये दंड वसुली करण्यात आली असल्याची माहिती मनपाचे जन संपर्क अधिकारी मिलिंद पळसुले यांनी दिली आहे .