Coronavirus: कोरोनाने १० दिवसांत वाढवली ठाणे जिल्ह्यात डोकेदुखी 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2020 01:39 AM2020-05-03T01:39:19+5:302020-05-03T01:39:36+5:30

ठाणे जिल्ह्यातील स्थिती । ठाणे महापालिका हद्दीत १८३, नवी मुंबईत ११५ रुग्ण वाढले, तर ११२ रुग्ण झाले बरे

Coronavirus: Coronavirus increases headaches in Thane district in 10 days | Coronavirus: कोरोनाने १० दिवसांत वाढवली ठाणे जिल्ह्यात डोकेदुखी 

Coronavirus: कोरोनाने १० दिवसांत वाढवली ठाणे जिल्ह्यात डोकेदुखी 

Next

पंकज रोडेकर 

ठाणे : लॉकडाउनचा दुसरा टप्पा संपत आला तरी ठाणे जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या कमी होत नसल्यामुळे चिंता वाढली आहे. जिल्ह्यात जोरदार मुसंडी मारली असून रुग्णसंख्या १० दिवसांत ५११ ने वाढली आहे. ठाणे महापालिका हद्दीत १८३, नवी मुंबईत ११५, कल्याण-डोंबिवलीत ७२ आणि मीरा-भार्इंदरमध्ये ४७ नवे रुग्ण सापडले आहेत. परिस्थिती चिंताजनक होत असतानाच या कालावधीत ११२ रुग्णांसह कोरोनामुक्त होऊ न घरी परतल्यामुळे काहीसा दिलासा मिळाला आहे.

ठाणे जिल्ह्यात १३ मार्चला पहिला कोरोना पॉझिटिव्ह रु ग्ण ठाणे महापालिका हद्दीत सापडला होता. तेव्हापासून २२ एप्रिलपर्यंत जिल्हाभरात ५०० कोरोनाबाधितांची नोंद झाली होती. त्यामध्ये १७ जणांचा कोरोना प्रादुर्भावाने मृत्यू झाला होता. तर ९६ जण ठणठणीत बरे होऊन कोरोनामुक्त झाले होते. त्यानंतर २३ ते २५ एप्रिलदरम्यान प्रतिदिन ४० ते ४५ रु ग्ण सापडले. पण, २६ एप्रिलला ७२ रुग्ण सापडले होते. त्यानंतर आठ दिवसांत चार वेळा ७० च्या पुढेच रु ग्ण सापडल्यामुळे ही संख्या १० दिवसांत ५११ ने वाढून एकूण संख्या ही १०११ च्या वर पोहोचली. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे जिल्हा रेड झोनमध्ये गेला आहे.

दहा दिवसांत उल्हासनगरमध्ये ८, भिवंडीत ७, अंबरनाथ ४, बदलापूर १४ आणि ठाणे ग्रामीणमध्ये ११ रुग्ण वाढले आहेत. तर, दगावणाऱ्यांची संख्या १२ ने वाढल्याची माहिती सूत्रांनी दिली.

कल्याण-डोंबिवलीत कोरोनाचे १२ नवे रुग्ण
केडीएमसी हद्दीतील कोरोनाचे १२ नवे रुग्ण आढळले असून, त्यात पोलीस व सरकारी आरोग्य कर्मचारी आहेत. त्यामुळे एकूण रुग्णांची संख्या १८१ झाली आहे. टिटवाळा पूर्वेतील ३९ वर्षांचा पोलीस, ३२ वर्षांचा पुरुष, २९ वर्षांची महिला आणि ५० वर्षांच्या महिला यांना कोरोना झाला आहे. तसेच मुंबईत कार्यरत असलेल्या व डोंबिवली पूर्वेत राहणाºया ३३ आणि ५३ वर्षांच्या व्यक्तीलाही लागण झाली आहे. कल्याण पूर्वेतील ४३ आणि ३३ वर्षांच्या व्यक्तीलाही संसर्ग झाला असून, ते दोघे मुंबईत कार्यरत आहेत. कल्याण पूर्वेतील ३४ आणि पश्चिमेतील ३५ वर्षांच्या व्यक्तीस कोरोनाची बाधा झाली आहे. ते दोघेही मुंबईतील सरकारी रुग्णालयात कार्यरत आहेत. याशिवाय कल्याण पश्चिमेतील ३६ वर्षांची व्यक्ती ही मुंबईतील खाजगी कंपनीत कामाला आहे. त्यालाही कोरोना झाला आहे. एकूण रुग्णांपैकी आतापर्यंत ६० जणांना उपचारांती घरी सोडले आहे.

भिवंडीत तीन नवे रुग्ण
भिवंडी शहरात शनिवारी तीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे शहरातील रुग्णसंख्या १६ वर पोहचली आहे. दरम्यान, पडघा-बोरिवलीतील महिलेला उपचारांनंतर घरी सोडले आहे.
शांतीनगर येथील ६० वर्षीय व्यक्ती महिन्यासाठी गुजरात अहमदाबाद येथे गेली होती. तेथून २८ एप्रिलला शांतीनगरमध्ये परतल्यानंतर मनपा आरोग्य विभागाने त्याच दिवशी क्वारंटाइन केंद्रात पाठवले होते. आझमीनगर येथील ३८ वर्षीय व्यक्ती ही आईच्या उपचारांसाठी मुंबई येथील जेजे हॉस्पिटलमध्ये होती. तेथून परतल्यानंतर त्याला क्वारंटाइन केले होते. तर कामतघर भाग्यनगर येथील २२ वर्षीय महिला मुंबईतील गोवंडी येथे गेली होती. तेथून परतल्यानंतर तिला क्वारंटाइन करण्यात आले होते. शनिवारी या तीनही रु ग्णांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आले असून त्यांच्या घरच्यांना भिवंडीतील क्वारंटाइन केंद्रात पाठवले असून हे तिन्ही रु ग्ण राहत असलेला परिसर मनपाने सील केला असल्याची माहिती मनपाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. जयवंत धुळे यांनी दिली.

Web Title: Coronavirus: Coronavirus increases headaches in Thane district in 10 days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.