Coronavirus: मीरा-भाईंदरमध्ये कोरोनावर ५६ जणांची मात; एकाच दिवशी परतले घरी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2020 01:41 AM2020-05-03T01:41:22+5:302020-05-03T01:41:54+5:30
जोशी रुग्णालयात साजरा झाला आनंदोत्सव
मीरा रोड : भाईंदरच्या जोशी रुग्णालयातून शनिवारी ५६ कोरोनामुक्त झालेल्या रु ग्णांना घरी सोडण्यात आले. यामुळे रुग्णालयात जणू आनंदोत्सवच साजरा केला. शहरातही आनंदाचे वातावरण आहे. एकूण १६१ पैकी तब्बल १०१ रु ग्ण आतापर्यंत बरे होऊन घरी परतले आहेत. कोरोनामुळे रोजचा दिवस चिंतेच्या छायेत जात असताना शनिवार मात्र शहरात आनंद घेऊन आला.
भाईंदरच्या पंडित भीमसेन जोशी रुग्णालयात कोरोनाची लागण झाल्याने दाखल असलेल्या रु ग्णांपैकी ५६ रु ग्णांना घरी सोडण्यात आले. यावेळी आमदार गीता जैन, महापौर ज्योत्स्ना हसनाळे, आयुक्त चंद्रकांत डांगे, उपमहापौर हसमुख गेहलोत, गटनेते हरिश्चंद्र आमगावकर, उपायुक्त डॉ. संभाजी पानपट्टे, रुग्णालयाचे प्रमुख डॉ. बाळासाहेब अरसूलकर यांच्यासह अन्य वैद्यकीय कर्मचारी, सफाई कामगार, सुरक्षारक्षक आदी उपस्थित होते. यावेळी सर्वांनी घरी जाणाऱ्या रु ग्णांना टाळ््यांच्या गजरात निरोप दिला. रुग्णालयात मोठे आनंदाचे वातावरण होते. कोरोनामुक्त झालेल्या या रुग्णांनीही उपस्थित सर्व डॉक्टर, परिचारिका, वॉर्डबॉय, सफाई कर्मचारी, सुरक्षारक्षक आदींचे आभार मानले.
रुग्णालयात सर्वांनी चांगली काळजी घेतली असे सांगत अनेकांनी हात जोडून वैद्यकीय सेवा बजावणाºया या देवदूतांना अभिवादन केले.
भार्इंदरच्या नारायण नगरमधील तीन वर्षांची मुलगीही आईबरोबर कोरोना मुक्त होऊन घरी गेली. पालिकेच्या रु ग्णवाहिकांमधून सर्वांना त्यांच्या घरी सोडण्यात आले. कोरोनावर मात करून घरी परतलेल्यांचेही रहिवाशांनी मोठ्या जल्लोषात स्वागत केले. जोशी रुग्णालय पालिकेने कोरोना रु ग्णालय जाहीर करायच्या आधीपासून येथे आवश्यक सुविधा देण्याची तयारी सुरू केली होती. पालिका प्रशासनासह आयुक्त डांगे, आमदार जैन, डॉ. अजय संख्ये, डॉ. अरसूलकर आदींनी आयसीयू, व्हेंटिलेटरची सुविधा तसेच रुग्णालयासाठी आवश्यक गोष्टींसाठी नियोजन केले होते. डॉ. प्रफुल्ल सामंत, डॉ. तेजस्वी सोनवणे, डॉ. जाधव आदींची टीम उपचारासाठी बनवली होती. या टीमचा आणि रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या टीमवर्कचा चांगला परिणाम असल्याचे सांगण्यात आले.
आजचा दिवस शहरासाठी सुवर्णाक्षरात लिहिण्यासारखा आहे. ५६ रु ग्णांना आज बरे करून पाठवले, याचा आनंद आहे. नागरिकांचे सहकार्य आहे. १०१ रु ग्ण बरे झाले असून ५७ रु ग्ण आहेत. तेही लवकर बरे होतील. - चंद्रकांत डांगे, आयुक्त
रु ग्णालयात डॉक्टरांपासून अगदी स्वच्छता करणाºया प्रत्येकाने आपल्या जीवाची पर्वा न करता कोरोना रु ग्णांचे उपचार व सेवा केली. आयुक्तांनी जातीने लक्ष देऊन काही कमी पडू दिले नाही. डॉक्टरांची समिती नियमित प्रत्येक केसनुसार चर्चा करून निर्णय घेत आहेत. कोरोना चाचणीचे विलंबाने मिळणारे अहवाल लवकर मिळू लागल्याने पटकन उपचार शक्य झाले. - डॉ. बाळासाहेब अरसूलकर, जोशी रुग्णालय प्रमुख