ठाणे: राज्याचे गृहनिर्माण मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी कोरोनावर मात केली आहे. त्यांना काल मुलुंडच्या फोर्टिस रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला. २३ एप्रिलपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. पुढील काही दिवस आव्हाड डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घरीच थांबतील. आव्हाड यांनीच ट्विटरवरुन ही माहिती दिली आहे.मी सुरुवातीला कोरोनाच्या लक्षणांकडे दुर्लक्ष केलं. मात्र सुदैवानं मी यामधून वाचलो, असं आव्हाड म्हणाले. 'सुरुवातीला माझी चाचणी निगेटिव्ह आली होती. त्यामुळे मी परिस्थिती गांभीर्यानं घेतली नाही,' असं आव्हाड यांनी सांगितलं. 'त्यानंतर मला ताप आला. माझी कोरोना चाचणी निगेटिव्ह आली असल्यानं ही लक्षणंदेखील दूर होतील, असं मला वाटलं. ती माझी चूक होती. त्याची मोठी किंमत मला मोजावी लागली,' असं आव्हाड म्हणाले.
गिलगिट-बाल्टिस्तानवर भारताच्या 'मास्टरस्ट्रोक'ला सिक्कीममधील संघर्षातून चिनी उत्तर, तज्ज्ञांचा दावाड्रॅगन संपूर्ण एव्हरेस्ट गिळंकृत करायच्या मार्गावर; नेपाळनं उठवला आवाज