Coronavirus News: कोरोना: पोलिसांच्या मृत्यूमुळे पोलीस खात्याचीही मोठी हानी- अनिल कुंभारे

By जितेंद्र कालेकर | Published: October 14, 2020 12:04 AM2020-10-14T00:04:26+5:302020-10-14T00:06:36+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : कोरोमुळे आॅन डयूटी शहीद होणाऱ्या पोलिसांमुळे त्यांच्या कुटूंबीयांप्रमाणेच पोलीस खात्याचीही मोठी हानी झाली आहे. ...

Coronavirus News: Corona: The death of a policeman is a big loss to the police department - Anil Kumbhare | Coronavirus News: कोरोना: पोलिसांच्या मृत्यूमुळे पोलीस खात्याचीही मोठी हानी- अनिल कुंभारे

शहीद श्रीकांत वाघ यांच्या कुटूंबीयांना ६० लाखांच्या धनादेशाचे वाटप

googlenewsNext
ठळक मुद्दे शहीद श्रीकांत वाघ यांच्या कुटूंबीयांना ६० लाखांच्या धनादेशाचे वाटपलोकमत इफेक्ट

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: कोरोमुळे आॅन डयूटी शहीद होणाऱ्या पोलिसांमुळे त्यांच्या कुटूंबीयांप्रमाणेच पोलीस खात्याचीही मोठी हानी झाली आहे. ती कधीही भरुन न येणारी आहे. या कुटूंबीयांच्या समस्यांचे निराकरण केले जाईल. शासनाकडून मिळणाºया अनुदानाबाबत तसेच अनुकंपा तत्वावर पाल्यांना नोकरीवर घेण्याबाबतही प्रशासकीय पातळीवर या कुटूंबीयांना सर्वतोपरी मदत दिली जाईल, अशी ग्वाही ठाण्याच्या पश्चिम प्रादेशिक विभागाचे अतिरिक्त पोलीस आयुक्त अनिल कुंभारे यांनी दिली.
कोरोनामुळे शहीद झालेले कळवा पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक श्रीकांत वाघ यांच्या पत्नी संगितीका वाघ यांना राज्य शासनाच्या वतीने कोविड योद्धा म्हणून देण्यात येणाºया ५० लाखांच्या अनुदानाचा धनादेश तसेच पोलीस महासंचालक कार्यालयाच्या वतीने पोलीस कल्याण निधीतून देण्यात येणारा दहा लाखांचा अशा ६० लाखांच्या धनादेशाचे वाटप कुंभारे यांच्या हस्ते मंगळवारी करण्यात आले. त्यावेळी या शहीद पोलीसांच्या कुटूंबीयांना मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. नौपाडा पोलीस ठाण्याच्या सभागृहात शहीद पोलीस कुटूंबीयांसाठी मार्गदर्शनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी वाघ कुटूंबीयांना या धनादेशाचेही वाटप त्यांनी केले.
‘रिअ‍ॅलिटी’ चेक अंतर्गत ‘आधी लढा कोरोनाशी, आता मदतीसाठी लढा’ या मथळयाखाली ठाण्यातील शहीद पोलीस कुटूंबीयांच्या व्यथा ‘लोकमत’मध्ये ५ आॅक्टोंबर रोजी प्रसिद्ध केल्या होत्या. याचीच गांभीर्याने दखल घेऊन ठाण्याचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी याबाबतच्या प्रक्रीयेला गती देण्याचे आदेश पोलीस प्रशासनाला दिले होते. अतिरिक्त आयुक्त संजय येनपुरे यांनी याबाबतचा पाठपुरावा केला. त्याच पार्श्वभूमीवर या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
ज्या कुटूंबीयांना शासकीय अनुदानाचे वाटप केले जात आहे, त्यांनी त्याचा योग्य प्रकारे विनियोग करावा. गुंतवणूक आणि बचत कशा प्रकारे करावी. अनुकंपा तत्वावर या कुटूंबीयांच्या वारसांना पोलीस खात्यात नोकरी मिळण्यासाठी कोणत्या कागदपत्रांची आवश्यकता आहे, शासनाकडून कशाप्रकारे आर्थिक मदत मिळवून दिली जाईल, त्यासाठी कोणत्या कागदपत्रांची पूर्तता करावी लागेल. त्याचा पत्रव्यवहार कसा करावा, याचीही इथ्यंभूत पण थोडक्यात माहिती त्यांनी दिली. वारसा हक्काच्याही काही अडचणी आहेत का? याबाबतही त्यांनी माहिती जाणून घेतली. यावेळी प्रशासनाच्या वतीने लिपीकांनीही तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश त्यांनी दिले.
यावेळी ठाणे, भिवंडी आणि वागळे इस्टेट या तीन परिमंडळांमधील १२ शहीद पोलीस कुटूंबीय उपस्थित होते. वाघ यांच्या प्रमाणेच इतरांचेही प्रस्ताव शासन दरबारी पाठविले आहेत. त्याबाबतची प्रक्रीया सुरु असल्याचेही ते म्हणाले.
यावेळी परिमंडळ एक ठाण्याचे पोलीस उपायुक्त सुभाष बुरसे, परिमंडळ पाच- वागळे इस्टेटचे पोलीस उपायुक्त अविनाश अंबुरे, नौपाडा विभागाच्या सहायक पोलीस आयुक्त नीता पाडवी, नौपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल मांगले, निरीक्षक रवींद्र क्षीरसागर, अविनाश सोंडकर आणि कळवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कन्हैया थोरात आदी यावेळी उपस्थित होते.

 

Web Title: Coronavirus News: Corona: The death of a policeman is a big loss to the police department - Anil Kumbhare

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.