लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: एकीकडे वाढत्या कोरोनाला रोखण्यासाठी अपयशी ठरल्यामुळे पालकमंत्र्यांना बदलण्याची मागणी भाजपने केलेली असतांना आता जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्या बदलीची मागणीही प्रदेश काँग्रेस कमिटी सदस्य मिलिंद खराडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे शुक्रवारी ट्वीटर तसेच निवेदनाद्वारे केली आहे. विशेष म्हणजे वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रथमच जिल्हाधिकाऱ्यांच्या बदलीची मागणी पुढे आली आहे.आपल्या निवेदनामध्ये खराडे यांनी म्हटले आहे की, ठाणे जिल्ह्यातील झपाटयाने वाढणारी कोरोना रु ग्णांची संख्या ही अतिशय चिंताजनक आहे. महाराष्ट्र शासनाने १८ जून रोजी अधिकृतरित्या जाहिर केलेल्या आकडेवारीनुसार ठाणे जिल्ह्यातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या ही २१ हजार ९९३ इतकी असून मृत पावलेल्यांची संख्याही ६७३ इतकी आहे. मुंबई खालोखाल राज्यात सर्वाधिक रु ग्णांची संख्या ठाणे जिल्ह्यात आहे. ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय हे कोरोना प्रसार रोखण्यात अपयशी ठरले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेऊन ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांची तात्काळ हकालपट्टी करण्यात यावी, असेही खराडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच महसूलमंत्री बाळासाहेब थोरात या महाविकास आघाडी सरकारकडे केली आहे.
Coronavirus News: ठाणे जिल्हयात कोरोनाचा प्रसार रोखण्यात असमर्थ ठरल्याने जिल्हाधिकाऱ्यांची बदली करावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2020 8:40 PM
कोरोनाला रोखण्यासाठी अपयशी ठरल्यामुळे ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना बदलण्याची मागणी भाजपने केलेली असतांना आता जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्याही बदलीची मागणीही प्रदेश काँग्रेस कमिटी सदस्य मिलिंद खराडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे शुक्रवारी ट्वीटर तसेच निवेदनाद्वारे केली आहे.
ठळक मुद्देप्रदेश काँग्रेस कमिटी सदस्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणीप्रथमच झाली जिल्हाधिकारी हटावची मागणी