CoronaVirus News: उल्हासनगरात अर्धेअधिक कोविड सेंटर रिकामे?; कोरोना रुग्णाची संख्या घटली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2020 03:44 PM2020-10-16T15:44:34+5:302020-10-16T15:44:47+5:30
शहरात एकून कोरोना रुग्णाची संख्या ९७६४ तर एकून कोरोना मुक्त रुग्णाची संख्या ८८९३ झाली.
- सदानंद नाईक
उल्हासनगर : महापालिकेकडे स्वतःचे रुग्णालय नसताना कोरोना रुग्णावर नियंत्रण मिळविण्यात यश मिळविले. रुग्णाची संख्या कमी असल्याने कोविड सेंटर मधील अर्धेअधिक बेड खाली असून तीच अवस्था खाजगी कोविड रुग्णालयाची झाली आहे. शासनाने दिलेले भिवंडी परिसरतील टाटा आमंत्रण सेंटर रुग्णा अभावी बंद केल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ दिलीप पगारे यांनी दिलीं आहे.
उल्हासनगर महापालिकेने सुरवातीला कोरोना रुग्णाची संख्या वाढताच, शासनाचे कॅम्प नं-४ मधील शासकीय प्रसूतीगृह रुग्णालय ताब्यात घेवुन रुग्णालयाचे रूपांतर कोविड सेंटर मध्ये केले. रूग्णालयात १७ व्हेंटिलेटर असून त्यापैकी १३ सुरू आहेत. तर ७० पैकी अर्धेअधिक ऑक्सिजन बेड आहेत. त्यानंतर कामगार हॉस्पीटल, रेडक्रॉस हॉस्पीटल, आयटीआय शाळा इमारत, महापालिका अभ्यासिका, तहसील कार्यालयाच्या नवीन इमारतीचे रूपांतर कोविड सेंटर मध्ये करण्यात आले. त्यापैकी आयआयटी शाळा इमारती मध्ये बहुतांश तर रेडक्रॉस हॉस्पीटल मधील अर्धेअधिक बेड ऑक्सिजन युक्त आहेत. तसेच संसर्ग झालेल्या रुग्णाच्या कुटुंब व संबंधितांना क्वारंटाईन करण्यासाठी भिवंडी हद्दीतील टाटा आमंत्रण सेंटर येथे उपचार केला हात होता. सद्यस्थितीत दररोज ५० पेक्षा कमी कोरोना संसर्ग रुग्णाची नोंद होत असून बरे होणाऱ्या रुग्णाची संख्या वाढत आहे.
शहरात एकून कोरोना रुग्णाची संख्या ९७६४ तर एकून कोरोना मुक्त रुग्णाची संख्या ८८९३ झाली. तर उपचार घेत असलेल्या एकून पाॅझिटीव्ह रुग्णांची संख्या ५५० आहे. त्यापैकी महापालिकेने उभारलेल्या कोविड रुग्णालय व कोविड सेंटर मध्ये २०५, होम आयलोशन मध्ये १७०, तर शहार व बाहेरील रूग्णालयात १७५ रुग्ण उपचार घेत आहेत. कामगार हॉस्पीटल, भिवंडीतील टाटा आमंत्रण केंद्र रुग्णा अभावी बंद आहेत. तर शहरातील ५ पेक्षा जास्त रुग्णालयाचे रूपांतर कोविड रूग्णालयात झाले. मात्र तेथील बेडही अर्ध्येअधिक खाली आहेत. एकूणच शहरातून कोरोनाची लाट ओसरल्याचे बोलले जात असून दुसरीकडे महापालिका पथकाने मास्क विना फिरत असलेल्या नागरिकांवर कारवाई सुरू केली. तसेच माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमे अंतर्गत सव्वा लाखा पेक्षा जास्त कुटुंबाचे सर्वेक्षण करण्यात आल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.
शहरात रुग्णाची संख्या होते कमी- डॉ. दिलीप पगारे
देशातील सर्वाधिक घनतेच्या शहराला कोरोना संसर्गाची भीती होती. मात्र काही दिवसापासून पोझिटीव्ह रुग्णाची संख्या कमी होत असून शहरात एकून ५५० पोझिटीव्ह रुग्ण आहेत. महापालिकेने उभारलेल्या कोविड सेंटर मधील अनेक बेड रिकामे असून कोविड रूग्णालयात रुपांतरीत झालेल्या खाजगी रुग्णालयाची तीच व्यवस्था झाल्याची प्रतिक्रिया महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ पगारे यांनी दिली. कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९१.०८ टक्के आहे.