Coronavirus News: ठाणे शहरातील भाजी मार्केटवर राहणार पालिकेची करडी नजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2020 11:42 PM2020-07-19T23:42:10+5:302020-07-19T23:45:03+5:30

केवळ हॉटस्पॉटच्या परिसरात ठाणे महापालिका प्रशासनाने कडक निर्बंध घातले आहेत. त्यामुळे नागरिकांनी तसेच व्यापाऱ्यांनी सोशल डिस्टसिंगच्या नियमांचे उल्लंघन करु नये, यासाठी ५० कर्मचाऱ्यांचे एक पथक तयार केले आहे. हे पथक भल्या पहाटे २ ते सकाळी ११ वाजेपर्यंत रस्त्यावरील भाजी विक्रेत्यांवर करडी नजर ठेवणार आहे.

Coronavirus News: Municipal Corporation will keep a close eye on vegetable market in Thane city | Coronavirus News: ठाणे शहरातील भाजी मार्केटवर राहणार पालिकेची करडी नजर

५० पालिका कर्मचा-यांची टीम तयार

googlenewsNext
ठळक मुद्दे भल्या पहाटेही पालिकेची पथके घालणार गस्त ५० पालिका कर्मचा-यांची टीम तयार

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: लॉकडाऊन काही प्रमाणात शिथिल करण्यात येऊन केवळ हॉटस्पॉटच्या परिसरात ठाणे महापालिका प्रशासनाने कडक निर्बंध घातले आहेत. त्यामुळे नागरिकांनी तसेच व्यापाºयांनी सोशल डिस्टसिंगच्या नियमांचे उल्लंघन करु नये, यासाठी ५० कर्मचा-यांचे एक पथक तयार केले आहे. हे पथक भल्या पहाटे २ ते सकाळी ११ वाजेपर्यंत रस्त्यावरील भाजी विक्रेत्यांवर करडी नजर ठेवणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
यापुढे कंटेनमेंट झोन वगळता संपूर्ण ठाणे शहरात लॉकडाऊन शिथिल करण्यात आले आहे. त्यामुळे जीवनाश्यक वस्तूंचे मार्केट,भाजी मार्केट त्याचबरोबर इतर दुकाने ही सम आणि विषम तारखेला सुरु ठेवण्याची मुभा पालिका प्रशासनाने २० जुलैपासून दिली आहे. हे सर्व होत असतांना कोणीही नियमांचे उल्लंघन करणार नाही, याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. अन्यथा कारवाईचा बडगा उगारण्यात येईल, असा इशारा पालिका उपायुक्त संदीप माळवी यांनी दिला आहे. अनेकदा लॉकडाऊन शिथिल केल्यानंतर भाजीपाला, किराणा आणि औषधे खरेदीच्या बहाण्याने मार्केट परिसरात गर्दी केली जाते. सोशल डिस्टसिंगचा फज्जा उडाल्यानंतर पुन्हा कोरोनाच्या रुग्ण संख्येमध्ये यापूर्वी वाढ झाल्याचे पालिका अधिकाºयांचे म्हणणे आहे. भाजी मार्केटमध्ये सोशल डिस्टसिंगच्या नियमांची गांभीर्याने अंमलबजावणी होत नसल्याने लॉकडाऊन शिथिल होण्याच्या एक दिवस आधीच रविवारी पहाटे पासूनच उपायुक्त संदीप माळवी, नौपाडा प्रभाग समितीच्या सहाय्यक आयुक्त प्रणाली घोंगे, सहाय्यक आयुक्त शंकर पाटोळे आणि ठाणे नगरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सोमवंशी यांच्यासह पालिका आणि पोलीस कर्मचाºयांनी मुख्य बाजारपेठेमध्ये गस्त घातली. यामध्ये अनलॉकच्या काळात व्यापारी, भाजी विक्र ेते आणि नागरिकांनी देखील नियमांचे उल्लंघन न करण्याचे आवाहन करण्यात आले.
अगदी लॉकडाऊनच्या दरम्यान देखिल पहाटेच्या सुमारास भाजीमार्केट सुरु झाल्यानंतर तिकडे सोशल डिस्टसिंगचे नियम पायदळी तुडविले जात असल्याच्या अनेक तक्रारी पालिकेकडे आल्या होत्या. यातूनच कोरोनाचा प्रादूर्भाव वाढण्याचा धोकोही वाढला होता. त्यामुळेच लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतरही पहाटे सुरु होणाºया मार्केट परिसरात कारवाई करण्यासाठी ५० कर्मचाºयांचे पथक तयार करण्यात आले आहे. याठिकाणी अगदी रस्त्यावरच किरकोळ विक्रेत्यांना घाऊक विक्रेते भाज्यांची विक्री करतात. याठिकाणी घाऊक दरात भाजीपाला उपलब्ध होत असल्यामुळे व्यापाºयांसह काही किरकोळ ग्राहकांचीही इथे मोठी गर्दी होत असते. या विशेष कारवाईसाठी पोलिसांची बाजारपेठेमध्ये गस्त राहणार असल्याची माहिती ठाणे नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सोमवंशी यांनी सांगितले. याठिकाणी होणारी संभाव्य गर्दी टाळण्यासाठी मार्केटच्या प्रवेश द्वारासह अन्यही एका ठिकाणी पोलिसांनी बॅरिकेटस लावले आहेत.
अनलॉकच्या काळात केवळ ज्या ठिकाणी भाजी मार्केट असेल आणि पालिका प्रशासनाने ठरवून दिलेल्या ठिकाणी भाजी विक्र ी करता येणार आहे. रस्त्यावर भाजी विक्र ी करण्यावर पूर्णपणे निर्बंध आहेत. अशा विक्र ेत्यांवर कारवाई केली जाणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. दरम्यान रविवारी देखील रस्त्यावर बसलेल्या फेरीवाल्यांवर पालिका प्रशासनाने मोठया प्रमाणात कारवाई केली आहे.

Web Title: Coronavirus News: Municipal Corporation will keep a close eye on vegetable market in Thane city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.