Coronavirus News: ठाण्यात एकाच दिवशी एक हजार २७७ रुग्णांनी केली कोरोनावर मात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2020 09:43 PM2020-07-19T21:43:30+5:302020-07-19T21:48:16+5:30
ठाणे महापालिका क्षेत्रात शनिवारी एकाच दिवशी तब्बल एक हजार २७७ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आतापर्यंतचा हा सर्वात मोठा विक्रम असून प्रकृती सुधारल्यामुळे घरी परतणाऱ्या रुग्णांसह पालिका प्रशासनाने समाधान व्यक्त केले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: ठाणे जिल्ह्यात सर्वाधिक म्हणजे १५ हजार ५१५ कोरोना बाधितांची संख्या असलेल्या ठाणे महापालिका क्षेत्रात शनिवारी एकाच दिवशी तब्बल एक हजार २७७ रु ग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आतापर्यंतचा हा सर्वात मोठा विक्र म असून प्रकृती सुधारल्यामुळे घरी परतणाºया रुग्णांसह पालिका प्रशासनाने समाधान व्यक्त केले आहे.
ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये कोरोनाबाधितांच्या संख्या ही १८ जुलैपर्यंत १५ हजार ५०० च्या घरात होती. रोज किमान यामध्ये ३०० पेक्षा अधिक कोरोना रुग्ण आढळून येत असल्याने ठाणेकरांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी प्रशासनाकडून गेल्या २० दिवसांपासून कडकडीत लॉकडाऊनही जाहीर केला आहे. त्याचबरोबर मिशन झिरो अंतर्गतही पालिकेच्या सर्व नऊ प्रभाग समितींमध्ये मोबाईल डिस्पेन्सरी सुरु करण्यात आली आहे. त्यातून तपासणी, निदान आणि तातडीने उपचार करण्यावर भर दिला जात आहे. त्यामुळे कोरोना वाढीवर नियंत्रण आणण्यास काहीसे यश मिळत असून रिकव्हरी रेटही वाढल्याची बाब समोर आली, असा पालिका प्रशासनाचा दावा आहे. ठाण्यात सध्या विविध रु ग्णालयांमध्ये पाच हजार ३२४ कोराना बाधित रुग्ण उपचार घेत आहेत. तब्बल नऊ हजार ६४५ रु ग्ण आता बरे होऊन सुखरुप घरी परतले आहेत. यामध्ये लहान मुलांपासून ते १०४ वर्षांच्या आजोबांचाही समावेश आहे. विशेष शनिवारी एकाच दिवशी 1एक हजार २७७ रु ग्ण कोरोनामुक्त झाल्यामुळे ठाणेकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.
ठाण्यात यापूर्वी एकाच दिवशी ६६४ रु ग्ण बरे झाले होते. हा रेकॉर्ड शनिवारी मोडीत निघाला असून दुप्पटीने रु ग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे ठाण्याचा रिकव्हरी रेटही ५६ वरुन ६४ टक्क्यांवर पोहचल्याची माहिती सूत्रांनी दिली.