Coronavirus News:ठाण्यात आणखी एका अधिकाऱ्यासह सहा पोलिसांना कोरोनाची लागण
By जितेंद्र कालेकर | Published: June 15, 2020 10:36 PM2020-06-15T22:36:03+5:302020-06-15T22:39:32+5:30
ठाणे शहर पोलीस आयुक्तालयात मुंब्रा आणि डायघर पोलीस ठाण्यासह वेगवेगळया ठिकाणच्या एका अधिकाºयासह सहा पोलिसांना कोरोनाची लागण झाल्याची बाब रविवारी समोर आली. दरम्यान, आतापर्यंत २७५ पोलिसांना कोरोनाची लागण झाली असली तरी तब्बल १९३ पोलीस कोरोनातून मुक्त झाले आहेत. कोरानातून बरे होण्याची संख्याही लक्षणीय आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: ठाणे शहर पोलीस आयुक्तालयातील मुंब्रा पोलीस ठाण्याच्या आणखी एका सहायक पोलीस निरीक्षकासह सहा पोलिसांना रविवारी कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले. आतापर्यंत २६ अधिकाºयांसह २७५ पोलीस बाधित झाले असून तब्बल १९३ पोलिसांनी कोरोनावर मात केली आहे. कोरोनातून मुक्त होण्याचे प्रमाणही पोलिसांमध्ये अधिक असल्यामुळे समाधान व्यक्त होत आहे.
लॉकडाऊनचे नियम आता मोठया प्रमाणात शिथिल करण्यात आले आहेत. अनेक ठिकाणचा बंदोबस्तही मोठया प्रमाणात कमी केला आहे. तरीही दाटीवाटीची वस्ती तसेच कोरोनाच्या रुग्णांची संख्या लक्षणीय असलेल्या भागातील पोलिसांनाही कोरोनाची लागण होत असल्याची बाब समोर आली आहे. मुंब्रा पोलीस ठाण्याचे एक सहायक पोलीस निरीक्षक यांनाही १३ जून रोजी त्रास झाल्याने त्यांची तपासणी करण्यात आली. त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्यांना निआॅन रुग्णालयात दाखल केले आहे. बाजूच्याच डायघर पोलीस ठाण्यातील एक पोलीस हवालदार दोन पोलीस नाईक अशा तीन कर्मचाºयांनाही १३ जून रोजी निआॅन रुग्णालयात दाखल करावे लागले. त्याआधी राबोडी पोलीस ठाण्यातील हवालदार आणि उल्हासनगरच्या नियंत्रण कक्षातील एका महिला कर्मचा-याचाही १२ जून रोजी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्यांनाही वेववेगळया रुग्णालयांमध्ये दाखल केले आहे. या सहा पोलिसांच्या संपर्कातील पोलीस आणि नागरिकांचीही माहिती घेतली जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
* आतापर्यंत २६ पोलीस अधिकारी आणि २४९ कर्मचारी अशा २७५ पोलिसांना कोरोनाची लागण झाली. सध्या सहा अधिकारी आणि ७४ कर्मचारी अशा ८० पोलिसांवर उपचार सुरु आहेत. तब्बल २० अधिकारी आणि १७३ कर्मचारी अशा १९३ पोलिसांनी यशस्वीरित्या कोरोनावर मात केली आहे. हे प्रमाण चांगले असल्यामुळे पोलिसांना दिलासा मिळाला आहे.