Coronavirus News: ठाणे आयुक्तालयात महिला अधिकाऱ्यासह आणखी दहा पोलीस कोरोनामुळे बाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 6, 2020 11:47 PM2020-07-06T23:47:30+5:302020-07-06T23:49:49+5:30

ठाणे शहर पोलीस आयुक्तालयामध्ये सोमवारी काहीसा दिलासा मिळाला. गेल्या २४ तासांमध्ये दहा जणांना लागण कोरोनाची लागण झाली. रविवारी २६ पोलिसांचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. सोमवारी त्या तुलनेत कमी पोलीस बाधित झाल्याची माहिती सूत्रांनी दिली

Coronavirus News: Ten more policemen, including a female officer, in Thane Commissionerate affected by coronavirus | Coronavirus News: ठाणे आयुक्तालयात महिला अधिकाऱ्यासह आणखी दहा पोलीस कोरोनामुळे बाधित

आतापर्यंत ६५३ पोलीस झाले बाधित

Next
ठळक मुद्देआतापर्यंत ६५३ पोलीस झाले बाधित४३८ पोलिसांनी केली कोरोनावर मात

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: ठाणे शहर पोलीस आयुक्तालयातील एका महिला पोलीस निरीक्षकासह आणखी दहा पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे सोमवारी बाधीत पोलिसांची संख्या ६५३ इतकी झाली आहे.
शनिवारी केवळ ४८ तासांमध्ये तब्बल ५० पोलिसांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. त्यापाठोपाठ ५ जुलै रोजीच्या अहवालानुसार शांतीनगरच्या महिला पोलीस निरीक्षक तसेच मुख्यालयातील चौघांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. याशिवाय, निजामपुरा, विष्णुनगर, परिवहन शाखा, श्रीनगर आणि बदलापूर पूर्व येथील प्रत्येकी एका पोलीस कर्मचाºयाला लागण झाली. त्यामुळे ६४ अधिकारी आणि ५८९ कर्मचारी असे ६५३ पोलीस बाधित झाले आहेत. तर ४६ अधिकाऱ्यांसह ३९२ कर्मचारी अशा ४३८ पोलिसांनी आतापर्यंत कोरोनावर मात केली असून चौघांना यामध्ये आपला जीव गमवावा लागला आहे.

Web Title: Coronavirus News: Ten more policemen, including a female officer, in Thane Commissionerate affected by coronavirus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.