लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: पोलिसांबरोबर आता ठाणे प्रादेशिक परिवहन (आरटीओ)कार्यालयातही कोरोनाचा शिरकाव झाला आहे. आरटीओ कार्यालयातील रमेश साळवी (५०, रा. टिळकनगर, डोंबिवली) आणि त्यांची पत्नी अर्चना साळवी (४५) यांचा शनिवारी कोरोनामुळे मृत्यु झाल्याची घटना घडली. अवघ्या काही तासांच्या अंतराने या दोघांचाही डोंबिवलीतील वेगवेगळया रुग्णालयांमध्ये मृत्यु झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.रमेश आणि त्यांची पत्नी या दोघांना रक्तदाब तसेच मधुमेहाचा आजार होता. त्यांना १९ जून रोजी श्वसनाचा त्रास झाल्याने डोंबिवलीतील एका स्थानिक नगरसेवकाने दोन वेगवेगळया रुग्णालयांमध्ये दाखल केले होते. प्रकृती गंभीर झाल्यामुळे अर्चना यांचा २० जून रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास मृत्यु झाला. त्यापाठोपाठ अवघ्या काही तासांमध्ये दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास रमेश यांचाही मृत्यु झाला. दोघांचाही अशा प्रकारे काही तासांच्या अंतराने मृत्यू झाल्याने आरटीओ वर्तुळात हळहळ व्यक्त होत आहे. तर चौघा कारागृह पोलिसांना कोरोनाची लागण झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.
Coronavirus News: ठाण्याच्या आरटीओ कर्मचाऱ्यासह पत्नीचाही अवघ्या चार तासांच्या अंतराने कोरोनामुळे मृत्यु
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2020 10:17 PM
ठाण्यातील आरटीओ कर्मचा-याचा आणि त्याच्या पत्नीचा अवघ्या काही तासांच्या अंतराने मृत्यु झाल्याची घटना शनिवारी घडली. या दोघांनाही शुक्रवारी श्वसनाचा त्रास झाल्याने त्यांना डोंबिवलीतील दोन वेगवेगळ्या खासगी रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले होते.
ठळक मुद्देडोंबिवलीतील घटनाठाण्याच्या आरटीओ कर्मचाऱ्यांमध्ये हळहळ