Coronavirus : ठाणे जिल्ह्यात आज कोरोनामुळे एका रुग्णाचा मृत्यू, तर सापडले २६७ नवे रुग्ण 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2021 09:01 PM2021-09-19T21:01:13+5:302021-09-19T21:01:48+5:30

Coronavirus in Thane: ठाणे जिल्ह्यात गेल्या २४ तासात २६७  कोरोना रुग्णांची वाढ झाली असून केवळ कल्याण डोंबिवलीतील एकाचा मृत्यू रविवारी  झाला आहे.  

Coronavirus: One patient died of corona in Thane district today, while 267 new patients were found | Coronavirus : ठाणे जिल्ह्यात आज कोरोनामुळे एका रुग्णाचा मृत्यू, तर सापडले २६७ नवे रुग्ण 

Coronavirus : ठाणे जिल्ह्यात आज कोरोनामुळे एका रुग्णाचा मृत्यू, तर सापडले २६७ नवे रुग्ण 

Next

ठाणे : जिल्ह्यात गेल्या २४ तासात २६७  कोरोना रुग्णांची वाढ झाली असून केवळ कल्याण डोंबिवलीतील एकाचा मृत्यू रविवारी  झाला आहे.  ठाणे महापालिका परिसरात ६७  रुग्णांच्या वाढीसह कल्याण डोंबिवलीला ५१ रुग्ण नव्याने वाढले. नवी मुंबईत ६७ रुग्णांच्या वाढ असून उल्हासनगरमध्ये दहा आणि भिवंडीत आज एक रुग्ण वाढला. मीरा भाईंदरला ४६ रुग्णांची वाढ झाली आहे. तर अंबरनाथला पाच आणि बदलापूरला १२ रुग्णांची वाढ झाली आहे. या खालोखाल जिल्ह्यातील गांवपाड्यात ११ रुग्ण सापडले असून मृत्यूची नोंद नाही. (One patient died of corona in Thane district today, while 267 new patients were found)

ठाणे जिल्ह्यात दिवसभरात २९०९१ नागरिकांचे लसीकरण
ठाणे : कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत ठाणे जिल्ह्यात आज दिवसभरात २९ हजार ९१ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. यासह जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ५९ लाख ८४ हजार ३२६ नागरिकांनी लसीकरण केले आहेत. त्यापैकी ४१ लाख ९५ हजार ८४७ नागरिकांना पहिल्या डोसचे आणि १७ लाख ८८ हजार ४७९ नागरिकांनी दुसरा डोस घेऊन कोरोनापासून स्वबचाव केला आहे. आज दिवसभरात जिल्ह्यात ठिकठिकाणी लसीकरणाचे सुमारे १६७ सत्र आयोजित करण्यात आले होते.

Web Title: Coronavirus: One patient died of corona in Thane district today, while 267 new patients were found

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.