दगडी पाटे-वरवंटे ग्रामीण भागातूनही हद्दपार

By admin | Published: April 4, 2016 02:00 AM2016-04-04T02:00:02+5:302016-04-04T02:00:02+5:30

शहरातून दगडी पाटे-वरवंटे केव्हाच गायब झाले व त्यांची जागा मिक्सर, फूड प्रोसेसर यांनी घेतली. धान्य दळण्याची जाती तर इतिहासजमा झाली. आता पॅकबंद आटा घरोघरी वापरला जातो.

Dedicated Pate-Vavantte also expatriates from rural areas | दगडी पाटे-वरवंटे ग्रामीण भागातूनही हद्दपार

दगडी पाटे-वरवंटे ग्रामीण भागातूनही हद्दपार

Next

सुधाकर वाघ,  धसई
शहरातून दगडी पाटे-वरवंटे केव्हाच गायब झाले व त्यांची जागा मिक्सर, फूड प्रोसेसर यांनी घेतली. धान्य दळण्याची जाती तर इतिहासजमा झाली. आता पॅकबंद आटा घरोघरी वापरला जातो. मात्र, ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातूनही पाटे-वरवंटे हद्दपार झाले आहेत. येथील आठवडाबाजारात त्यांची मागणी पूर्णपणे घटली आहे.
ग्रामीण भागातही वीजपुरवठ्याची परिस्थिती सुधारल्याने आणि वेगवेगळ्या कंपन्यांनी मिक्सर वापरण्याची सुविधा उपलब्ध केल्याने या भागात पाटे-वरवंटे वापरणे बंद झाले आहे. शहरात पिठाच्या चक्क्यांमधून धान्य दळून आणण्याची पद्धत सुरू झाल्यापासून जाती इतिहासजमा झाली. आता अनेक घरांत पॅकबंद आटा, बेसन यांचा वापर केला जातो. ग्रामीण भागातही हेच लोण पसरू लागल्याने तेथील जाती वापरणे थांबले आहे.
मुरबाड तालुक्यातील सरळगाव हे आठवडाबाजाराचे ठिकाण आहे. या ठिकाणी दर मंगळवारी हा बाजार भरतो. भाजीपाला तसेच जनावरे विक्र ीसाठी येतात. आपल्या दैनंदिन गरजा भागवण्यासाठी परिसरातील लोक या बाजारात गर्दी करतात. पूर्वी या बाजारात अनेक लोक दगडी पाटे-वरंवटे विकत घेऊन जात. मात्र, आता ते खरेदी करणाऱ्यांची संख्या कमी झाल्याचे या बाजारात येणारे कारागीर सांगतात.
हल्ली त्यांची मागणी खूप कमी झाली आहे. दिवसभर उन्हातान्हात बसून पाटे-वरवंटे तयार केले तरी त्यांची विक्री होत नाही. आतापर्यंत याच गोष्टी विकून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह केला, अशी माहिती अर्जुन जाधव यांनी दिली. यापुढे लोकांना पाटे-वरवंटे वापरायचे नसतील तर माझ्या व माझ्या कुटुंबाच्या जगण्याचा प्रश्न निर्माण होणार आहे, असेही ते म्हणाले.
ग्रामीण भागातील काही महिलांना याबाबत विचारले असता त्या म्हणाल्या की, पाट्या-वरवंट्यावर वाटण करण्यापेक्षा मिक्सरमध्ये करणे अधिक सोयीचे आहे. शिवाय, स्वच्छतेच्या दृष्टीनेही ते अधिक गरजेचे आहे. सध्या घरात असलेले पाटे-वरवंटे वापराविना पडून असल्याने त्याला टाकी लावून घेण्याचा किंवा नव्याने खरेदी करण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. यामुळे हे पारंपरिक व्यवसाय लोप पावण्याची भीती आहे.

Web Title: Dedicated Pate-Vavantte also expatriates from rural areas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.