उल्हासनगर : स्वतःच्या जीवाची पर्वा न करता सापांना जीवदान देणाऱ्या सर्पमित्रांना मानधन व विमा कवच देण्याची मागणी सर्पमित्र अभिलाष डावरे यांनी शासनाकडे निवेदनाद्वारे केली. सर्पमित्र पर्यावरणाचा खरा समतोल राखण्याचे काम करीत असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.
सर्पमित्र स्वतःच्या जीवाची पर्वा न करता विषारी व बिनविषारी सापांना पकडून, त्यांना सुरक्षित जंगलात सोडतात. मात्र, सर्पमित्राला सापाने दंश केल्यास त्यांचे प्राण जाऊ शकतात. अनेक सर्पमित्रांचे प्राण गेल्यामुळे त्यांचे कुटुंब उघड्यावरही पडले आहे. शासनाने सर्पमित्रांकडे दुर्लक्ष न करता त्यांना ओळखपत्र, विमाकवच व मानधन देण्याची मागणी सिद्धार्थ बहुउद्देशीय सामाजिक संस्था अध्यक्ष मंगेश टपाल, अभिलाष डावरे, कांचन कातडे, भारत डावरे, गंगाधर वाघमारे, मारुती झाडे व साहील कातडे यांनी केले आहेत. वनविभाग, अग्निशमन दल व पोलीस यांना सर्पमित्र मोलाचे सहकार्य करीत असून त्यांच्यामुळे प्राण्यांना व निसर्गाला मोठी मदत होत असल्याचे डावरे म्हणाले.
--------------