अहिल्यादेवी होळकरांच्या वंशजांनी दिली ठाण्यातील अहिल्यादेवी होळकर स्मारकाला भेट 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2022 12:53 AM2022-06-15T00:53:13+5:302022-06-15T00:53:30+5:30

यावेळी अक्षय शिंदे यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करून आभिवादन केले.

Descendants of Ahilya Devi Holkar visit Ahilya Devi Holkar Memorial in Thane | अहिल्यादेवी होळकरांच्या वंशजांनी दिली ठाण्यातील अहिल्यादेवी होळकर स्मारकाला भेट 

अहिल्यादेवी होळकरांच्या वंशजांनी दिली ठाण्यातील अहिल्यादेवी होळकर स्मारकाला भेट 

Next

 
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे वंशज अक्षय शिंदे यांनी सोमवारी ठाण्यातील मासुंदा तलाव येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारकाला भेट दिली. महाराष्ट्राच्या अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील चौंडी या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्म गावातील अहिल्यादेवी होळकर यांचे वंशज अक्षय शिंदे यांनी सोमवारी सायंकाळी ठाण्यातील मासुंदा तलाव येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारक येथे भेट दिली. 

यावेळी अक्षय शिंदे यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करून आभिवादन केले. त्यानंतर धनगर प्रतिष्ठानचे अध्यक्ष दीपक कुरकुंडे यांच्या हस्ते अक्षय शिंदे यांना चांदीचा मुकुट, फेटा घालून सत्कार करण्यात आला. यावेळी धनगर समाजाचे जेष्ठ नेते बाबासाहेब दगडे, संजय वाघमोडे, धनगर प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष महेश गुंड, सचिव गणेश बारगीर, उपाध्यक्ष राजेश वीरकर, उपसचिव तुषार धायगुडे, कार्यकारणी सदस्य दिपक झाडे, उत्तम यमगर, अंकुश उघडे, सचिन बुधे, जय मल्हार ग्रुपचे अध्यक्ष नरेश शिरगिरे, अॅड जगदीश शिंगाडे, अशोक वायकुळे,ऋषिकेश घुले,ऍड अमोल घुरडे आदींसह मान्यवर यावेळी उपस्थित होते.

समाजाने एकत्र राहून काम केले पाहिजे तरच समाजाच्या सर्व मागण्या मान्य होऊ शकतात. यंदा संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात सर्वत्र पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची साजरी करण्यात आली. यामाध्यमातून धनगर समाजाचे एकीचे दर्शन दिसून आले. त्यामुळे समाधान वाटले, असे अक्षय शिंदे म्हणाले. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मस्थान असलेल्या चौंडी  येथे अहिल्यादेवी होळकर वस्तू संग्रहालय,घाट व इतर कामांसाठी राज्य सरकारकडे पाठपुरावा करून आपण २० कोटी रुपये मंजूर करून घेतले असून लवकरच याचे काम सुरु होणार असल्याचे अक्षय शिंदे म्हणाले. ठाण्यातील अहिल्यादेवी होळकर स्मारकासाठी काही मदत लागल्यास करण्याचे आश्वासन यावेळी शिंदे यांनी दिले.

Web Title: Descendants of Ahilya Devi Holkar visit Ahilya Devi Holkar Memorial in Thane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :thaneठाणे