शहरं
Join us  
Trending Stories
1
मेट्रोच्या भुयारी मार्गाचे लोकार्पण नरेंद्र मोदींच्या हस्ते ऑनलाईन होणार, नवीन तारीख घोषित
2
शेतकरी नेते रविकांत तुपकरांना पोलिसांकडून अटक, आंदोलन सुरू असतानाच कारवाई
3
हिजबुल्लाहला आणखी एक धक्का, हवाई हल्ल्यात ड्रोन कमांडर ठार, इस्रायलचा दावा
4
मराठा आरक्षणासाठी पती- पत्नीने घेतले विषारी द्रव, प्रकृती चिंताजनक 
5
माझे काम पाहून धीरुभाई अन् टाटाही चकीत झाले; नितीन गडकरींनी सांगितला तो किस्सा...
6
साताऱ्यात काँग्रेसला हवा माण, वाई अन् कऱ्हाड दक्षिण मतदारसंघ
7
छगन भुजबळांची प्रकृती बिघडली, हॉस्पिटलमध्ये दाखल; पुण्यातून विशेष विमानाने मुंबईत आणलं
8
परिवर्तन महाशक्तीच्या नेत्यांनी घेतली मनोज जरांगे पाटील यांची भेट, प्रकृतीची केली विचारपूस
9
अक्षय शिंदेचा मृतदेह ठाण्यात दफन करण्यास मनसेचा विरोध, कळवा पोलिसांना दिलं पत्र
10
देशातील पहिली एअर ट्रेन दिल्लीत सुरू होणार; जगातील कोणत्या देशांमध्ये आहे 'ही' सुविधा?
11
मनोजराव कोणालाही भेटायचे नाही, तब्यतेची काळजी घ्या; संभाजीराजेंचा मनोज जरांगे यांना सल्ला
12
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे पंतप्रधान मोदींनी फोन करून केले अभिनंदन
13
विधानसभा निवडणुकीत अजित पवार गट किती जागा जिंकणार? NCP चा इंटरनल सर्व्हे सर्वांनाच चकित करणारा!
14
264 धावा नव्हे...; रोहित शर्माच्या नावावर याहूनही एक मोठा विक्रम! मोडणे एखाद्या स्वप्नासारखे
15
बक्षिसाची रक्कम पोलीस कल्याण निधीत जमा करा, 'त्या' पोलिसांची मनसेला विनंती
16
चीनच्या नव्या अस्त्रामुळे जग चिंतेत, ही क्षेपणास्त्रंसुद्धा क्षणार्धात करू शकतात कुठलंही शहर नष्ट
17
"भाजपचे सरकार आल्यास PoK जम्मू-काश्मीरमध्ये सामील होईल", योगी आदित्यनाथ यांचे जनतेला आश्वासन
18
आता सीबीआयला तपासासाठी राज्य सरकारची परवानगी घ्यावी लागणार, कर्नाटक सरकारचा मोठा निर्णय
19
धक्कादायक! सासूचा रुग्णालयात मृत्यू; जावयाने मृतदेह घेऊन गाठली बँक, केली पैशांची मागणी...
20
"मोदी खूप शक्तिशाली आहेत, अमाप पैसा आहे, पण...", अरविंद केजरीवालांचा निशाणा

सिव्हील रूग्णालयात मिळणार आता अपंगत्वाचे प्रमाणपत्र

By admin | Published: March 03, 2016 2:15 AM

येथील सिव्हील रु ग्णालयामध्ये आता आॅडियोलॉजीस्ट असल्यामुळे त्यांच्याव्दारे अपंग व्यक्तींची तपासणी करून तत्काळ अपंगत्वाचे प्रमाणपत्र देण्याचा निर्णय आमदार निरंजन डावखरे

ठाणे : येथील सिव्हील रु ग्णालयामध्ये आता आॅडियोलॉजीस्ट असल्यामुळे त्यांच्याव्दारे अपंग व्यक्तींची तपासणी करून तत्काळ अपंगत्वाचे प्रमाणपत्र देण्याचा निर्णय आमदार निरंजन डावखरे यांनी जिल्हाधिकारी अश्विनी जोशी , जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी उदय चौधरी यांच्या सोबत घेतलेल्या बैठकीत घेण्यात आला.या निर्णयाच्या अनुषंगाने कर्णबधीरत्वाचे प्रमाणपत्र मिळण्याकरिता आता कर्णबधीर अपंगांना श्रवण चाचणी करण्यासाठी बांद्रा येथील भारतीय श्रवण विकलांग संस्थेमध्ये जाण्याची आवश्यकता नाही. याशिवाय ० ते ५ वर्ष वयाच्या अपंग मुलांची तपासणी देखील येथेच होणार आहे. त्यामुळे आरटीई या कायद्याअंतर्गत अपंग विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यासाठी प्रमाणपत्र उपयुक्त ठरणार आहे. तसेच मतिमंद व्यक्तीचा आयक्यू तपासणीबाबत सायकॉलॉजिस्ट तज्ञ व्हीजीटर स्वरु पात उपलब्ध करण्याची सूचना जिल्हाधिकारी अश्विनी जोशी यांनी जिल्हा शल्य चिकित्सक यांना केली. आठवड्यातून दोन दिवस तपासणी करण्यासाठी शासन पातळीवर पाठपुरावा करण्याचे आश्वासन डावखरे यांनी दिले. जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक , शिक्षणाधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी, , समाजकल्याणचे सहाय्यक उपआयुक्त यावेळी उपस्थित होते.