भिवंडी- भिवंडी तालुक्यातील दापोडे ग्रामपंचायती तर्फे अपंग कल्याण निधी अंतर्गत अपंगांना प्रत्येकी ३० हजार रुपयांच्या धनादेशाचे वितरण सरपंच चिंतामण पाटील उपसरपंच योगिता पाटील यांसह हस्ते मंगळवारी करण्यात आले .या प्रसंगी एड. भारद्वाज चौधरी, भरत पाटील,तुळशीराम पाटील, ग्रामपंचायत सदस्य विजय पाटील, अनिता पाटील, गीता पाटील , सुमती चौधरी ,आशा पाटील,संदेश पाटील, प्रेमानाथ पाटील, ग्रामविकास अधिकार चंद्रकांत बुटेरे आदी मान्यवर उपस्थित होते
प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थेने आपल्या उत्पन्नाच्या पाच टक्के रक्कम अपंग कल्याण निधी अंतर्गत खर्च करणे बंधनकारक असून त्याकडे बहुसंख्य ग्रामपंचायती दुर्लक्ष करीत असताना गावातील ग्रामस्थ अँड भारद्वाज चौधरी व आगरी सांस्कृतिक व शैक्षणिक संस्थेचे देवानंद पाटील यांनी याकामी पाठपुरावा केल्याने दापोडे ग्रामपंचायत क्षेत्रातील बारा लाभार्थ्यांना एकूण ३ लाख ३६ हजार एवढ्या रक्कमेची वितरण करण्यात आले .
समाजातील दिन दुबळे व वंचित घटकांना खऱ्या अर्थानं ग्रामस्वराज प्रक्रियेत सामावून घेणं अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी उपलब्ध शासकीय योजना त्यांच्यापर्यंत पोहचवण्याची खरी गरज असते. त्याच अनुषंगाने दापोडे ग्रामपंचायतीने पुढाकार घेतला बद्दल त्यांचे अभिनंदन करून मागील वर्षभरात कोरोना ने थैमान घातल्याने अनेक सर्वसामान्यांचे जनजीवन विस्कळीत झाले होते त्यातून सावरण्यासाठी सदर निधीचा मोठा आधार या अपंग व्यक्तींना त्यांच्या कुटुंबियांना होणार असल्याचे प्रतिपादन सर्वोच्च न्यायालयाचे वकील व सामाजिक कार्यकर्ते अँड भारद्वाज चौधरी यांनी केले.