केवळ क्रिकेटपुरते आपले देशप्रेम नको - डॉ. सुभाष भामर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2018 06:48 AM2018-03-12T06:48:04+5:302018-03-12T06:48:04+5:30

भारत-पाकिस्तानचा क्रि केट सामना सुरू असताना अनेक नागरिकांचे देशप्रेम उफाळून येते.परंतु, देश व सीमेवरील जवानांना कायम नागरिकांनी पाठिंबा दिला पाहिजे, असे मत संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी रविवारी भिवंडीत व्यक्त केले.

 Do not want your patriot just for cricket - Dr. Subhash Bhamar | केवळ क्रिकेटपुरते आपले देशप्रेम नको - डॉ. सुभाष भामर

केवळ क्रिकेटपुरते आपले देशप्रेम नको - डॉ. सुभाष भामर

googlenewsNext

भिवंडी : भारत-पाकिस्तानचा क्रि केट सामना सुरू असताना अनेक नागरिकांचे देशप्रेम उफाळून येते.परंतु, देश व सीमेवरील जवानांना कायम नागरिकांनी पाठिंबा दिला पाहिजे, असे मत संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी रविवारी भिवंडीत व्यक्त केले.
तालुक्यातील काल्हेर ग्रामपंचायतीने केलेल्या विकासकामांचे लोकार्पण राज्यमंत्र्यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी खासदार कपिल पाटील होते. याप्रसंगी माजी आमदार योगेश पाटील, पंचायत समितीच्या सभापती रवीना जाधव, सरपंच श्रीधर पाटील, जिल्हा परिषद सदस्य देवेश पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी राज्यमंत्री भामरे यांनी आपल्या भाषणात सांगितले की, देशाच्या तिन्ही टोकांवरील भौगोलिक सीमांची परिस्थिती वेगवेगळी आहे. काही ठिकाणी २० हजार फुटांचा डोंगर आहे. तर, काही ठिकाणी केवळ १०० मीटरवर पाकिस्तानची चौकी आहे. खडतर हवामानात देशाचे संरक्षण करण्यासाठी सैनिक प्राण पणाला लावतात. त्यांना देशातील नागरिकांनी पाठिंबा द्यायला हवा. केवळ भारत-पाकिस्तान क्रि केट सामन्याच्या वेळी देशप्रेम उफाळून येता कामा नये. तर, आपण देशाचे सैनिक आहोत, ही भावना ठेवून नागरिकांनी देश व सैनिकांमागे उभे राहिले पाहिजे, असे त्यांनी सांगितले.
काल्हेरमधील विकासकामांचा रेटा पाहून ही ग्रामपंचायत असल्याचे वाटत नाही, असे भामरे यांनी यावेळी नमूद केले. तब्बल २२ ते २५ हजार कोटींची विकासकामे मंजूर झालेला भिवंडी हा देशातील एकमेव लोकसभा मतदारसंघ आहे, अशा शब्दांत भामरे यांनी खासदार पाटील यांच्या कामाकडे लक्ष वेधले.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भिवंडी लोकसभा मतदारसंघासाठी कोट्यवधींचा निधी मंजूर केला. त्यातून प्रत्येक गावात काँक्रिटचे रस्ते तयार होणार आहेत. भिवंडीत मेट्रो रेल्वेसह सहापदरी बायपास मंजूर झाला आहे. या कामांचे श्रेय पूर्णपणे मुख्यमंत्र्यांचे आहे. मात्र, याबाबत राजकारण केले जात आहे, असा आरोप पाटील यांनी केला. राष्ट्रीय हरित लवादाने खाडीतून रेती काढण्याबाबत बंदी घातली. मात्र, त्याबाबत तोडगा काढण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. यासंदर्भात लवकरच सकारात्मक निर्णय होईल. त्यातून हजारो भूमिपुत्रांना दिलासा मिळेल, असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला.

काल्हेरला रणगाडा, तोफ भेट

काल्हेर ग्रामपंचायतीने उभारलेल्या उद्यानात रणगाडा बसवण्याची विनंती खासदार कपिल पाटील यांनी केली. रणगाड्याबरोबरच विकासाच्या आड येणाºया विरोधकांना उत्तर देण्यासाठी तोफ देण्याचीही विनंती खासदारांनी केली. ती संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी मंजूर केली. त्यांनी लवकरच काल्हेर ग्रामपंचायतीला रणगाडा व तोफ भेट देणार असल्याचे जाहीर केले.

Web Title:  Do not want your patriot just for cricket - Dr. Subhash Bhamar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.