लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : घरापासून दूर राहणाऱ्या कोविड रुग्णांचाही विचार करून यंदा कोविड रुग्णालय वा केंद्रांमध्ये रुग्णालय प्रशासन, पालिका प्रशासनाने दिवाळी साजरी कऱण्यावर भर दिला. मुंबई महानगरपालिकेच्या वांद्रे-कुर्ला संकुल येथील जम्बो कोविड केंद्रात दिवाळीनिमित्त फराळ, मिठाईचे वाटप करण्यात आले. शिवाय, डॉक्टर व येथील आरोग्य कर्मचाऱ्यांनी मिळून रुग्णांसह दिवाळी साजरी केली.
कोरोनाच्या उपचारादरम्यान रुग्णांना शारीरिक व मानसिक आव्हानास तोंड द्यावे लागते. अशा परिस्थितीत, त्यांचा एकटेपणा, ताणतणाव आणि चिंता यावर मात करण्यासाठी पालिकेने मोबाइल फोनची व्यवस्था केली आहे. जेणेकरून तो आपल्या घरच्यांशी बोलत आहेत. त्याचप्रमाणे, तणावमुक्त होण्यासाठी समुपदेशनाचीही व्यवस्था केली आहे.
दिवाळीनिमित्त पालिकेच्या वांद्रे कुर्ला कोविड काळजी केंद्रात रुग्णांना डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मिठाई, चकली आणि इतर खाद्यपदार्थांचे वाटप पालिकेने केले. याविषयी, अधिक माहिती देताना केंद्राचे अधिष्ठाता डॉ. राजेश डेरे यांनी सांगितले, केंद्रातील ४०० रुग्णांना खाद्यपदार्थांचे वाटप केले.
खाद्यपदार्थांचे वाटपउपचारांमध्ये गुंतलेल्या डॉक्टर, नर्स व इतर कामगारांना खाद्यपदार्थ दिले.
रुग्णांची घेतली काळजीकोरोनाच्या उपचारादरम्यान रुग्णांना शारीरिक व मानसिक आव्हानास तोंड द्यावे लागते. अशा परिस्थितीत, त्यांचा एकटेपणा, ताणतणाव आणि चिंता यावर मात करण्यासाठी पालिकेने मोबाइल फोनची व्यवस्था केली आहे. जेणेकरून तो आपल्या घरच्यांशी बोलत आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार दिवाळीनिमित्त रुग्णांना भोजन वाटप करण्यात आले. कोविड केअर केंद्र ही कर्मचार्यांनी सजवले होते. काही केंद्रांमध्ये संगीतही वाजवले गेले.- सुरेश काकाणी, पालिकेचे अतिरिक्त आयुक्त (आरोग्य)