डोंबिवली : महाशिवरात्रीनिमित्त खिडकाळेश्वर, मानपाडेश्वर व पिंपळेश्वर मंदिरात भाविकांची गर्दी 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2018 01:33 PM2018-02-13T13:33:41+5:302018-02-13T14:21:37+5:30

डोंबिवलीमध्ये महाशिवरात्रीनिमित्त खिडकाळेश्वर, मानपाडेश्वर आणि पिंपळेश्वर मंदिरात दर्शनासाठी भाविकांची गर्दी झाली आहे.

Dombivali : Mahashivratri celebration at Pipaleshwar, Manpadeshwar and khidkaleshwar | डोंबिवली : महाशिवरात्रीनिमित्त खिडकाळेश्वर, मानपाडेश्वर व पिंपळेश्वर मंदिरात भाविकांची गर्दी 

डोंबिवली : महाशिवरात्रीनिमित्त खिडकाळेश्वर, मानपाडेश्वर व पिंपळेश्वर मंदिरात भाविकांची गर्दी 

googlenewsNext

डोंबिवली - डोंबिवलीमध्ये महाशिवरात्रीनिमित्त खिडकाळेश्वर, मानपाडेश्वर आणि पिंपळेश्वर मंदिरात दर्शनासाठी भाविकांची गर्दी झाली आहे. कल्याण डोंबिवली परिसरातील लाखो भाविक या तीन मंदिरांमध्ये दर्शनासाठी येत असतात. त्यासाठी पोलिसांचासुद्धा चोख बंदोबस्त असतो. कल्याण-डोंबिवलीच्या पंचक्रोशीत पांडवकालीन हेमाडपंथी बांधणीचे तेराव्या शतकातील शिवमंदिर म्हूणन खिडकाळेश्वर मंदिर प्रसिद्ध आहे. महाशिवरात्रीनिमित्त लाखो भाविक कल्याण, डोंबिवली, नवी मुबंई, ठाणे दर्शनासाठी येतात. विशेष म्हणजे गेल्या 6 वर्षांपासून दुधाचा अभिषेक बंद करण्यात आला आहे. दुधाचा अभिषेक न करता, गरिबांमध्ये त्याचे वाटप करा, असे आवाहन भाविकांना करण्यात आले आहे.  मंदिराकडून करण्यात आलेल्या या आवाहनाला भाविकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.

खिडकाळी मंदिर विशेष आकर्षण ठरली ती काढलेली रांगोळी . या रांगोळीत तांदूळ,तूप, कोळसा आणि विविध दगडांचा वापर करण्यात आला आहे. मंदिरात दर्शन घेण्यासाठी रात्रीपासूनच मोठी रांग लागली आहे. याच ठिकाणी जत्रासुद्धा असते. त्याचप्रमाणे विविध कार्यक्रम पण घेतले जातात. याचे सर्व नियोजन खिडकाळेश्वर मंदिर ट्रस्ट आणि गावदेवी चॅरिटेबल ट्रस्ट केले जात. स्थानिक ग्रामस्थ वासुदेव पाटील, गौतम पाटील , बालकृष्ण पाटील, पंढरीनाथ पाटील आणि सुमारे 200 स्वयंसेवक करत असतात. तर डोंबिवलीमधील मानपाडेश्वर मंदिरात सकाळ पासून दर्शनासाठी भाविकांची गर्दी झाली आहे.

मंदिरात भजन, कीर्तन दिवस चालू असून उद्या महाप्रसादाचे आयोजन केले, अशी माहिती दत्ता वझे यांनी सांगितले. मंदिराचे सर्व नियोजन गुलाब वझे, पांडुरंग म्हात्रे, सदाशिव भोईर आणि वझे परिवार यांच्याकडून केले जाते. डोंबिवलीमधील अजून एक प्रसिद्ध मंदिर म्हणजे पिंपळेश्वर मंदिर. पिंपलेश्वर मंदिरात शंकराची रांगोळी, सेल्फी पॉईंट आणि चार वेद हे मुख्य आकर्षण आहे. रांगोळी आणि चार वेदाची पुस्तके पाहण्यासाठी भाविकांची गर्दी होत आहे.  दरवर्षीप्रमाणे यावर्षीदेखील आरोग्य शिबिर ठेवण्यात आले असे स्थानिक नगरसेविका प्रेमा प्रकाश म्हात्रे यांनी सांगितले. तर डोंबिवलीमध्ये पॉज संस्थेच्या कार्यकर्त्यानी भाविकांकडून तब्बल 50 लीटर दूध जमा केले आहे. जमलेले दूध डोंबिवलीमधील काही संस्थाना व प्राण्यांना देण्यात येणार असे पॉज संस्थेकडून सांगण्यात आले.

Web Title: Dombivali : Mahashivratri celebration at Pipaleshwar, Manpadeshwar and khidkaleshwar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.