डोंबिवली: उच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्वांनूसार डोंबिवलीत रेल्वे स्थानक परिसरात १५० मीटर तर शाळा, प्रार्थनास्थळ, हॉस्पिटल आदी ठिकाणी ना फेरीवाला क्षेत्र घोषित करण्यासाठी तब्बल ३६ रस्ते आणि २०० ठिकाण निवडली आहेत. कल्याण-डोंबिवली महापालिकेचे अभियंते सुभाष पाटील, प्रशांत भुजबळ यांनी डोंबिवली शहर स्तरावर आराखडा तयार केला असून तो आयुक्त पी.वेलरासू यांच्या अंतिम मंजूरीसाठी कल्याण मुख्यालयात पाठवण्यात आला आहे.फेरीवाला प्रश्नासंदर्भात नियंत्रण रेषा मारण्यासाठी महापालिकेकडून दिरंगाई होत असल्याकारणे ‘लोकमत’मध्ये सातत्याने वृत्तांकन करण्यात येत होते, त्याची दखल घेत मनसेने दखल घेतली. गुरुवारी मनसे जिल्हाध्यक्ष प्रकाश भोईर, शहराध्यक्ष मनोज घरत यांच्यासमवेत नेते राजू पाटील यांनी चर्चा केली. त्या चर्चेनूसार दोघांनीही डोंबिवलीत भुजबळ, पाटील या महापालिकेच्या अभियंत्यांसमवेत भेट घेतली. तेथून आराखडा समजून घेत तो मंजूरीसाठी कल्याण मुख्यालयात शहर अभियंत्यांसमवेत चर्चा केली. शुक्रवारी आयुक्तांकडे तो आराखडा मंजूरीसाठी पाठवण्यात आला असून आगामी दोन दिवसात त्यास मंजूरी मिळेल असा विश्वास भुजबळ यांनी ‘लोकमत’शी बोलतांना व्यक्त केला. भोईर यांनी सर्वप्रथम स्थानक परिसराला प्राधान्य द्यावे, नियंत्रण रेषा तातडीने मारण्यात याव्यात अशी मागणी केली. त्यांच्या माहितीनूसार शनिवार, रविवारमध्ये त्या रेषा मारण्याच्या कामाला शुभारंभ होणार आहे.'' या दोन दिवसात जर महापालिकेने नियंत्रण रेषांसंदर्भात निर्णय घेतला नाही तर आॅइलपेंटचे डबे महापालिकेला भेट देण्यात येतील. तसेच त्यांनी दिरंगाई केली तर मनसैनिक नियंत्रण रेषा रस्त्यांवर मारायलाही मागेपुढे बघणार नाही असा इशारा भोईर, घरत यांनी दिला.''
डोंबिवलीत महापालिकेने ना फेरीवाला क्षेत्रासाठी निवडले ३६ रस्त्यांसह २०० जागांचा आराखडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 01, 2017 5:56 PM
डोंबिवली: उच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्वांनूसार डोंबिवलीत रेल्वे स्थानक परिसरात १५० मीटर तर शाळा, प्रार्थनास्थळ, हॉस्पिटल आदी ठिकाणी ना फेरीवाला क्षेत्र घोषित करण्यासाठी तब्बल ३६ रस्ते आणि २०० ठिकाण निवडली आहेत. कल्याण-डोंबिवली महापालिकेचे अभियंते सुभाष पाटील, प्रशांत भुजबळ यांनी डोंबिवली शहर स्तरावर आराखडा तयार केला असून तो आयुक्त पी.वेलरासू यांच्या अंतिम ...
ठळक मुद्देपूर्व -पश्चिमेकडील रस्ते-जागांचा समवोश आयुक्तांच्या मंजूरीची प्रतिक्षातर मनसैनिक देणार आॅइलपेंटचे डबे महापालिकेला भेट