कष्टकरी महिलांना लोकलची दारे बंदच, रेल्वे प्रशासनाविरोधात नाराजीचा सूर
By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2020 02:09 AM2020-10-26T02:09:27+5:302020-10-26T07:16:20+5:30
Mumbai Local News : नवरात्रीच्या निमित्ताने लोकलसेवा महिलांसाठी सुरू केली असली, तरी भाजीपाला, फळे, मासळीविक्रेत्या महिलांसाठी मात्र लोकलची दारे बंदच असल्याने अशा महिलां आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न कायम आहे.
मीरारोड - नवरात्रीच्या निमित्ताने लोकलसेवा महिलांसाठी सुरू केली असली, तरी भाजीपाला, फळे, मासळीविक्रेत्या महिलांसाठी मात्र लोकलची दारे बंदच असल्याने अशा महिलां आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न कायम आहे.
भाईंदरपासून थेट वसई-विरारपुढे सफाळे ते थेट पालघर-डहाणूपर्यंतच्या भागात भाजीपाला, फळे, फळांची बागा्यती आहेत. तसेच मासेमारीचा
व्यवसायही मोठा आहे. ग्रामीण भागातून स्थानिक महिला भाजीपाला विक्रीसाठी मुंबई, उपनगरात लोकलने प्रवास करतात. मीरा-भाईंदर, वसई-
विरारमध्येही भाजीपाला, मासे, फळविक्रीसाठी रोज सफाळे-पालघर- डहाणूवरून महिला यायच्या. या व्यवसायावरच त्यांच्या कुटुंबीयांचा उदरवनिर्वाह वर्षांनुवर्षे करत आहेत. परंतु, मार्चअखेरीस कोरोनामुळे लोकल बंद करण्यात आल्या. शिवाय, बाजार-मंडईही बंद केल्या. तेव्हापासून महिलांचा व्यवसाय बंद असून उपजीविकेचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.
काही महिलांनी पोटाची खळगी भरायची म्हणून खाजगी टेम्पोवाल्यांना भाडे ठरवून जमेल तसा व्यवसाय सुरू ठेवण्याची धडपड चालवली. परंतु, टोपली भरून भाजीविक्रीला जाणाऱ्या महिलांना टेम्पोचं लांबचं भाडं परवडणार नसल्याने लोकल सुरू होण्याची प्रतीक्षा करत होत्या. नवरात्रीपासन महिलांना
लोकलप्रवासाची राज्य सरकारने खुली केल्याने आपल्याला व्यवसायाचा पुनश्य हरिओम होईल, अशी आशा कष्टकरी महिलांना होती. लोकलसेवा
महिलांसाठी सुरू झाली, मात्र कष्टकरी महिलांना प्रवासास मनाई केली जात आहे. त्यामुळे रेल्वेने आम्हाला
प्रवासाची परवनगी दिली पाहिजे, अशी मागणी या महिनांनी केली आहे.