शहरं
Join us  
Trending Stories
1
PM नरेंद्र मोदींच्या महाराष्ट्रात १० प्रचारसभा; भाजपासह महायुतीचे किती उमेदवार विजयी झाले?
2
महाराष्ट्रात ओवेसींचं '15 मिनिट'चं राजकारण 'फुस्स'; AIMIM चे 16 पैकी 15 उमेदवार पराभूत
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण ते नवाब मलिक...; या 17 मोठ्या नेत्यांना चाखावी लागली पराभवाची धूळ...!
4
'माझे परममित्र देवेंद्रजी फडणवीस...', दणदणीत विजयानंतर PM मोदींनी केले अभिनंदन
5
मुस्लिमबहुल मतदारसंघात भाजपचा हिंदू शिलेदार विजयी; विरोधात 11 मुस्लिम उमेदवार...
6
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: नांदेड पोटनिवडणुकीत अखेर काँग्रेसचा विजय; रविंद्र चव्हाण यांचा १४५७ मतांनी विजय
7
काही लोकांनी दगाफटका करून अस्थिरता निर्माण केली, पण महाराष्ट्राने शिक्षा दिली; मोदींचा घणाघात
8
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “जनतेचाही विश्वास बसलेला नाही, विधानसभा निकाल अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्वीकार्ह”: काँग्रेस
9
ओवेसींच्या AIMIM ने महाराष्ट्रात खाते उघडले, 'हा' उमेदवार अवघ्या 75 मतांनी विजयी...
10
महायुतीच्या विजयाने बिहारच्या आगामी निवडणुकीची पायाभरणी केली- चिराग पासवान
11
साकोलीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा २०८ मतांनी निसटता विजय
12
Sharad Pawar: शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; पुणे जिल्ह्यात अवघ्या एका जागेवर तुतारी वाजली, दिग्गज पराभूत!
13
डमी उमेदवारामुळे रोहित पवारांची सीट आलेली धोक्यात; अखेर कर्जत-जामखेडचा निकाल जाहीर...
14
राज ठाकरेंमुळे आदित्य ठाकरेंची आमदारकी वाचली; गेल्यावेळी थेट पाठिंबा, यावेळी...
15
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: महायुतीची त्सुनामी, मविआसह मनसेलाही तडाखा; राज ठाकरेंचे एकाच वाक्यात भाष्य, म्हणाले...
16
एकनाथ शिंदे भाजपसमोर मुख्यमंत्रीपदाची मागणी करणार? 'हे' 5 मुद्दे महत्वाचे ठरणार...
17
शपथविधीचे ठिकाण ठरले? राजभवनावर होणार नाही, पुन्हा वानखेडेवर भव्यदिव्य करण्याच्या हालचाली
18
Dahanu Vidhan Sabha Election Result 2024 Live : भगव्या वादळात फडकले लाल निशाण, डहाणूत माकपचे विनोद निकोले विजयी
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : "निकाल येतील जातील...; तुमचा 'राजूदादा' ही हाक आयुष्यात कमावलेली सर्वात मोठी संपत्ती"

Corona Vaccination: कोविडचा दुसरा डोस घेतलेल्या वाहनचालकाचा भिवंडीत मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: March 03, 2021 5:47 AM

Corona Vaccination: आरोग्य विभागात  खळबळ; घटनेची चौकशी करण्याची कुटुंबीयांची मागणी 

- नितीन पंडित लोकमत न्यूज नेटवर्कभिवंडी : कोरोनाचा धोका वाढू नये म्हणून देशभर नागरिकांना कोरोनापासून बचाव करणाऱ्या लसीकरणास सुरुवात झाली आहे. मात्र, लसीकरणाचा दुसरा डोस घेऊन प्रतीक्षा कक्षात थांबलेल्या इसमास चक्कर आल्याने त्यास उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केल्याची घटना भिवंडीतील भाग्यनगर येथील लसीकरण केंद्रात मंगळवारी घडली. 

    मृत्यूचे नेमके कारण अजूनही समजले नसल्याने आरोग्य विभागातदेखील खळबळ उडाली आहे.सुखदेव किर्दत (वय ४५), असे मृत्यू झालेल्या इसमाचे नाव असून, ते भिवंडीतील एका खासगी डॉक्टरकडे वाहनचालक म्हणून काम करत होते. मंगळवारी सकाळी ११ वाजता ते कोविड लसीचा दुसरा डोस घेण्यासाठी शहरातील भाग्यनगर येथील कोविड लसीकरण केंद्रात गेले असता दुसरा डोस घेतल्यानंतर ते प्रतीक्षागृहात थांबले होते. त्यानंतर साधारण पंधरा मिनिटांनी त्यांना चक्कर आल्याने ते खाली पडल्याने त्यांना उपचारासाठी भिवंडीतील स्व. इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयात नेले असता तेथील डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. किर्दत हे सकाळी ११ वाजता लसीकरण केंद्रात आले. त्यांचा रुग्ण इतिहास व इतर वैद्यकीय बाबींची चौकशी व तपासणी केली असता सर्व व्यवस्थित होते. त्यानंतरच त्यांना लसीकरणाचा दुसरा डोस दिला.  मात्र, प्रतीक्षागृहात किर्दत बसले असता त्यांना चक्कर आल्याने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात पाठविले, अशी माहिती लसीकरण लसीकरण केंद्रातील वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी दिली.  या घटनेची संपूर्ण चौकशी करण्याची मागणी मयत सुखदेव किर्दत यांची पत्नी सोनाली किर्दत यांनी केली आहे. 

लस घेतल्यानंतर किर्दत यांचा मृत्यू नेमक्या कोणत्या कारणाने झाला याबाबत शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर माहिती मिळेल, त्यासाठी ठाणे आरोग्य विभागाकडून वरिष्ठ अधिकाऱ्यांचे पथकदेखील भिवंडीत दाखल झाले आहे. शवविच्छदन अहवालानंतरच नेमके कारण समजेल.-डॉ. के.आर. खरात, मुख्य वैद्यकीय अधिकारी, भिवंडी मनपा

दुसरा डोस घेणार असल्याची माहिती सकाळी मला माझ्या पतीने दिली होती. नेहमीप्रमाणे आज ते कामावरदेखील गेले. मात्र, दुपारी मला त्यांचा अपघात झाला असल्याचा फोन आल्याने मी आयजीएम रुग्णालयात आले असता त्यांच्या निधनाची बातमी समजली. या घटनेने मला धक्का बसला असून, या घटनेची सखोल चौकशी करून मला न्याय द्यावासोनाली किर्दत, मयत सुखदेव किर्दत यांची पत्नी

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लस