ठेकेदार मिळत नसल्याने पार्किंग धोरणात बदल, नव्याने निविदा मागविल्या
By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2020 01:29 AM2020-01-23T01:29:55+5:302020-01-23T01:30:11+5:30
रात्र पार्किंगची संकल्पना बारगळली
ठाणे - पालिकेच्या धोरणानुसार शहरातील १७७ रस्त्यांवर पार्किंगची व्यवस्था करण्यात येणार आहे. याठिकाणी तब्बल ९ हजार ८५५ वाहने पार्क होऊ शकणार आहेत.
पार्किंगचे दरही तीन वर्षांपूर्वीच महासभेत मंजूर झाले आहेत. त्यासाठीचे स्पॉट अंतिम झाल्यानंतर शहरातील बहुतेक ठिकाणी पालिकेने पिवळे पट्टेदेखील मारले होते. आता तेही पुसले गेले आहेत. रात्रीच्या पार्किंगची संकल्पनादेखील यावेळी पालिकेने पुढे आणली होती. ती सुरूकेव्हा झाली आणि बंद केव्हा झाली, याचा थांगपत्ताही ठाणेकरांना लागू शकला नाही.
घोडबंदरला स्पॉट वाढविणार
दरम्यान, महापालिकेने अ, ब, क आणि ड अशा चार श्रेणींमध्ये रस्ते निश्चित केले आहेत. त्यानुसार अ वर्गात २९, ब वर्गात ५०, क वर्गात ३० आणि ड वर्गात ५७ रस्त्यांचा समावेश आहे. परंतु, आता नौपाड्यात उड्डाणपूल तयार झाल्याने आणि शहरातील काही रस्त्यांच्या रुंदीकरण झाले असल्याने, तसेच २०१३ ते २०२० या कालावधीत वाहनांच्या संख्येतही लाखोंची वाढ झाली असल्याने पालिकेने आता पार्किंगचे स्पॉटही बदलण्याचा निर्णय घेतला असून घोडबंदर भागात ते वाढविण्याची तयारी पालिकेने केली आहे.