मीरा रोडच्या कनकिया भागात माती माफिया बेफाम, खारफुटीचा नाशप्रकरणी डंपर जप्त

By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2018 08:50 PM2018-01-21T20:50:58+5:302018-01-21T20:51:14+5:30

मीरा रोडच्या कनकिया भागात कांदळवन - पाणथळ क्षेत्राचा -हास करून माती भराव करताना डंपर पकडण्यात आला असून, अटक चालकास दोन दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे.

Dumpers seized in Kania area of ​​Mira Road, Mafia spoof, Kharfuti; | मीरा रोडच्या कनकिया भागात माती माफिया बेफाम, खारफुटीचा नाशप्रकरणी डंपर जप्त

मीरा रोडच्या कनकिया भागात माती माफिया बेफाम, खारफुटीचा नाशप्रकरणी डंपर जप्त

googlenewsNext

मीरा रोड - मीरा रोडच्या कनकिया भागात कांदळवन - पाणथळ क्षेत्राचा -हास करून माती भराव करताना डंपर पकडण्यात आला असून, अटक चालकास दोन दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे.

कनकिया भागात मोठ्या प्रमाणात कांदळवन, पाणथळ, सीआरझेड व ना विकास क्षेत्रात सातत्याने बेकायदा माती भराव केला जात आहे. खारफुटीच्या झाडांची तोड करण्यात आली आहे. पर्यावरणाचा -हास केल्याप्रकरणी अनेक गुन्हे मीरा रोड व नवघर पोलीस ठाण्यात दाखल आहेत. मुंबई उच्च न्यायालयाने देखील या भागाची दखल घेतली आहे.

तसे असताना देखील बडे बिल्डर, काही लोकप्रतिनिधी यांनी मात्र पालिकेच्या संगनमताने सातत्याने भराव, बांधकामे चालवली आहेत. पालिकेने तर गटार व रस्ता बांधून बिल्डरांचा मार्ग मोकळा केलाय. येथील अन्नपूर्णा इमारतीसमोर सातत्याने माती भराव करून कांदळवन व पाणथळ क्षेत्राचा -हास सुरू असल्याच्या तक्रारी होत होत्या. परंतु संबंधित यंत्रणा मात्र त्याकडे दुर्लक्ष करत होती. या प्रकरणी वरिष्ठांच्या आदेशानंतर मंडळ अधिकारी लक्ष्मण पवार यांनी पर्यावरण संरक्षण समिती सदस्यांसह घटनास्थळी कारवाई करून माती भराव करणारा डंपर जप्त केला.

नवघर पोलीस ठाण्यात जमीन मालक हरिभाई गंगादास मर्चमट, डंपर चालक इब्रहिम फारुक खान ( २९ ) रा. क्विन्स पार्क, मीरारोड, डंपर मालक हरिगेंद पाल, संजय हरिगेंद पालसह अन्य चालक, क्लीनर आदींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. वरिष्ठ निरीक्षक राम भालसिंह यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक गिरीश भालचीम तपास करीत असून चालक इब्रहिम फारुक खान याला अटक करण्यात आली आहे. ठाणे न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे. भालचीम हे पुढील तपास करत आहेत. या आधी देखील येथे पालिका ठेकेदार श्रीजी कंस्ट्रक्शन सह जमीन मालकाविरुद्ध गुन्हा दाखल झालेला आहे. सातत्याने या ठिकाणी चालणा-या बेकायदा माती भरावाविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाईची गरज असून, उच्च न्यायालयाच्या आदेशा नुसार येथील भराव काढून कांदळवनाची लागवड करण्याची मागणी रहिवाशांनी केली आहे.

Web Title: Dumpers seized in Kania area of ​​Mira Road, Mafia spoof, Kharfuti;

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.