नेवाळीप्रकरणी आठ जणांना जामीन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2017 03:36 AM2017-08-14T03:36:04+5:302017-08-14T03:36:04+5:30
नेवाळीच्या विमानतळाची जमीन परत करण्याच्या मागणीसाठी २२ जूनला झालेल्या आंदोलनातील आठ जणांना न्यायालयाने प्रत्येकी १५ हजारांचा जामीन मंजूर केला
लोकमत न्यूज नेटवर्क
कल्याण : नेवाळीच्या विमानतळाची जमीन परत करण्याच्या मागणीसाठी २२ जूनला झालेल्या आंदोलनातील आठ जणांना न्यायालयाने प्रत्येकी १५ हजारांचा जामीन मंजूर केला आहे. गुरुनाथ चिकणकर, मिलिंद चिकणकर, अखिल सोरखादे, त्र्यंबक म्हात्रे, ऋषिकेश म्हात्रे, मनोज म्हात्रे, मुकेश कोळेकर अशी त्यांची नावे आहेत.
नेवाळी आंदोलनप्रकरणी पोलिसांनी हिललाईन व मानपाडा पोलिस ठाण्यात चार गुन्हे दाखल केले होते. तीन गुन्हे हिललाईन तर एक गुन्हा मानपाडा पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला होता. पोलिसांना मारहाण करणे, ज्वलनशील पदार्थ बाळगणे आदी विविध गंभीर स्वरुपाची कलमे यात लावण्यात आली होती. या आंदोलनात सार्वजनिक मालमत्तेचे जवळपास एक कोटी नऊ लाखांचे नुकसान झाल्याचा पंचनामा करण्यात आला होता. चार गुन्ह्यात ६७ जणांना आरोपी करण्यात आले होते.