ठाण्यात रंगणार एकविसावे महाराष्ट्र पक्षिमित्र संमेलन, उल्हास राणे भूषवणार संमेलनाचे अध्यक्षपद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2017 03:40 AM2017-09-21T03:40:48+5:302017-09-21T03:40:53+5:30

‘परिसरातील पक्षी - त्यांचा जीवनक्रम आणि सवयी’ या सूत्रावर आधारित ठाण्यात एकविसावे महाराष्ट्र पक्षिमित्र संमेलन रंगणार आहे. या संमेलनात ठाणे महापालिका आणि मँग्रुव्ह सेल, मुंबई यांचा महत्त्वाचा सहभाग आहे.

Eklavya Maharashtra Parivitri Sammelan, Ulhas Rane Bhushwaj Sammelan presided over in Thane | ठाण्यात रंगणार एकविसावे महाराष्ट्र पक्षिमित्र संमेलन, उल्हास राणे भूषवणार संमेलनाचे अध्यक्षपद

ठाण्यात रंगणार एकविसावे महाराष्ट्र पक्षिमित्र संमेलन, उल्हास राणे भूषवणार संमेलनाचे अध्यक्षपद

Next

ठाणे : ‘परिसरातील पक्षी - त्यांचा जीवनक्रम आणि सवयी’ या सूत्रावर आधारित ठाण्यात एकविसावे महाराष्ट्र पक्षिमित्र संमेलन रंगणार आहे. या संमेलनात ठाणे महापालिका आणि मँग्रुव्ह सेल, मुंबई यांचा महत्त्वाचा सहभाग आहे. या संमेलनाचे अध्यक्षपद ज्येष्ठ निसर्ग अभ्यासक आणि पक्षिमित्र उल्हास राणे भूषवणार आहेत.
होप नेचर ट्रस्ट आणि महाराष्ट्र पक्षिमित्र संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार, २५ नोव्हेंबर आणि रविवार, २६ नोव्हेंबर या दिवशी गडकरी रंगायतन येथे हे संमेलन आयोजित केले आहे. दोन दिवस चालणा-या या संमेलनात अभ्यासक, संशोधक यांच्याबरोबर हौशी पक्षिमित्र विविध विषयांवरील सादरीकरणे करणार आहेत. ठाण्यातील पक्षी हे ठाणे शहर व परिसरात आढळणाºया निवडक १०० पक्ष्यांचा परिचय करून देणारे पुस्तक प्रकाशित करण्यात येणार आहे. या संमेलनाच्या निमित्ताने पक्षी छायाचित्रांची स्पर्धा आणि प्रदर्शन भरवण्यात येणार आहे. मुंबईशी स्पर्धा करून आपले नागरी क्षेत्र वाढवणाºया ठाण्याला निसर्गाचा वारसा लाभलेला आहे. एका बाजूला खाडीकिनारा आणि दुसºया बाजूला संजय गांधी नॅशनल पार्क यामध्ये वसलेल्या ठाण्याला समृद्ध जैवविविधतेचा ठेवा लाभलेला आहे. येऊर आणि नागलामधील संमिश्र जंगल, खाडीकिनाºयावरील खारफुटी वन आणि ठाणे पूर्व भागातील खुरट्या झाडांचा प्रदेश यामुळे ठाण्यात पक्ष्यांचे कमालीचे वैविध्य पाहायला मिळते. ठाणे खाडीतील ५० चौरस किलोमीटरचा परिसर फ्लेमिंगो सँक्च्युरी म्हणून घोषित केला असून त्यात ऐरोली येथील कोस्टल आणि मरिन बायोडायव्हर्सिटी सेंटरचाही समावेश आहे.
या अभयारण्याच्या परिसरात सुमारे ३० हजार ग्रेटर आणि लेसर प्रकारचे फ्लेमिंगो हिवाळ्यामध्ये स्थलांतर करून येतात. त्याचबरोबरच या अभयारण्यामध्ये सुमारे २०० प्रकारचे अन्य पक्षी आणि इतर अनेक प्रकारचे सागरी जीव आढळतात. त्यामुळेच ठाण्यासारख्या शहरी क्षेत्रात महाराष्ट्र पक्षिमित्र संमेलन होत आहे, असे आयोजकांनी सांगितले.
>राणे हे यापूर्वी बीएनएचएस या संस्थेच्या एज्युकेशन कमिटीचे अध्यक्षपद आणि बीएनएचएसच्या सेक्रेटरीपदाची धुरा त्यांनी सांभाळली आहे. पश्चिम घाट बचाओ मोहिमेत त्यांनी पुढाकार घेतला होता. त्यांच्या अध्यक्षपदाखाली भरणाºया या संमेलनात महाराष्ट्राच्या विविध भागांतले सुमारे ७०० ते ८०० पक्षिमित्र, अभ्यासक सहभागी होणार आहेत.

Web Title: Eklavya Maharashtra Parivitri Sammelan, Ulhas Rane Bhushwaj Sammelan presided over in Thane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.