एकनाथ शिंदे क्रिकेट क्लब (ब) संघाचा पराभव; अंबरनाथ रायझिंगने मारली बाजी

By प्रज्ञा म्हात्रे | Published: May 9, 2024 03:27 PM2024-05-09T15:27:55+5:302024-05-09T15:28:23+5:30

अंबरनाथ रायझिंग क्रिकेट क्लबने प्रथम फलंदाजी करून मोठे आव्हान उभे करण्याची रणनीती आखली होती.

Eknath Shinde Cricket Club (B) team defeat; Ambernath Rising win | एकनाथ शिंदे क्रिकेट क्लब (ब) संघाचा पराभव; अंबरनाथ रायझिंगने मारली बाजी

एकनाथ शिंदे क्रिकेट क्लब (ब) संघाचा पराभव; अंबरनाथ रायझिंगने मारली बाजी

ठाणे - शेवटच्या षटकापर्यंत रंगलेल्या सामन्यात अंबरनाथ रायझिंग क्रिकेट क्लबने  गतविजेत्या एकनाथ शिंदे क्रिकेट क्लब (ब) संघाचा ३ धावांनी पराभव करत महाराष्ट्र माझा सेवा संस्था आयोजित १२ व्या ठाणे प्रीमियर लीग टी २० क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.  विजयासाठी  १२५ धावांचा पाठलाग करणाऱ्या एकनाथ शिंदे क्रिकेट क्लब ब संघाला १२२ धावांवर रोखत अंबरनाथ रायझिंग क्रिकेट क्लबने पहिल्यांदाच विजेतेपदाच्या करंडकावर नाव कोरत ९९,९९९ रुपयांचे रोख बक्षीस मिळवले. 

स्पर्धेत सातत्यपूर्ण कामगीरी करणाऱ्या अंबरनाथ रायझिंग क्रिकेट क्लबच्या सामन्यातील आणि स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. उपविजेत्या एकनाथ शिंदे क्रिकेट क्लब ब संघाला ५५,५५५ रुपयांचे बक्षीस पटकावले.  

अंबरनाथ रायझिंग क्रिकेट क्लबने प्रथम फलंदाजी करून मोठे आव्हान उभे करण्याची रणनीती आखली होती. नाणेफेकीचा कौल विरोधात गेल्यावरअपेक्षेप्रमाणे फलंदाजी करण्याची संधी मिळालेल्या अंबरनाथ क्रिकेट क्लबला पहिला धक्का पहिल्याच चेंडूवर मिळाला. अंजदीप लाडने सलामीची जोडी फोडत धावांचे खातेही न उघडलेल्या अंबरनाथ क्रिकेट क्लब ब संघाला अडचणीत आणले. पण या धक्क्यानंतर श्रीराज घरतने नाबाद ५० आणि परीक्षित वळसंगकरने २० धावा करत संघाला शतकी धावसंख्या उभारून दिली. अमित पांडे, धृमील मटकर, अमन खानने प्रत्येकी दोन आणि अंजदीप लाड, हेमंत बुचडे आणि अर्जुन शेट्टीने प्रत्येकी एक फलंदाज बाद केला.

माफक आव्हानाला सामोरे जाताना अमन खानने २२ धावांची खेळी करत संघाला आश्वासक सुरुवात करून दिली. पण त्यानंतर थोड्या थोड्या क्रमाने फलंदाज बाद झाल्याने एकनाथ शिंदे क्रिकेट क्लब ब संघाची मधली फळी दडपणाखाली आली. या नाजूक परिस्थितीत विकी पाटीलने ३१ आणि आशय सरदेसाईने १८ धावा करत संघाला विजयाची आस दाखवली. पण हे दोघे बाद झाल्यावर जेत्या संघाच्या गोलंदाजांनी अचूक टप्प्यावर मारा करत प्रतिस्पर्ध्यांच्या फलंदाजांना डोके वर काढण्याची संधी मिळू दिली नाही. फलंदाजाना दबावाखाली ठेवताना परिक्षीत वळसंगकर आणि कर्णधार प्रथमेश महालेने प्रत्येकी तीन बळी मिळवले. दशरथ चव्हाणने दोन आणि सौद मंसूरीने एक फलंदाज बाद केला.

Web Title: Eknath Shinde Cricket Club (B) team defeat; Ambernath Rising win

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.