ठाण्यात भांडणानंतर घराबाहेर पडलेल्या धाकटयाचा मोठया भावाने दात पाडला: मोठयाला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2017 05:45 PM2017-12-05T17:45:55+5:302017-12-05T17:59:02+5:30

भांडणाचा वचपा काढण्यासाठी धाकटया भावाला जबर मारहाण करुन त्याचा दात पाडणा-या गाझी शेख या मोठया भावाला राबोडी पोलिसांनी अटक केली. त्याच्याविरुद्ध यापूर्वीही हाणामारीचे गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

The elder brother who came out of the house after a fight in Thane, hit his big tooth | ठाण्यात भांडणानंतर घराबाहेर पडलेल्या धाकटयाचा मोठया भावाने दात पाडला: मोठयाला अटक

ठाण्यात भांडणानंतर घराबाहेर पडलेल्या धाकटयाचा मोठया भावाने दात पाडला: मोठयाला अटक

Next
ठळक मुद्देभांडणाचा वचपा काढण्यासाठी केला हल्लाराबोडी पोलिसांची कारवाईपोलिसांनी केला लोखंडी रॉड हस्तगत

ठाणे : मोठया भावाबरोबर होणा-या नेहमीच्या वादाला कंटाळून घराबाहेर पडलेल्या मेहमूद शेख (३६) या धाकटया भावाला रॉडने डोक्यावर मारहाण करीत त्याचा दात पाडणा-या गाझी (४०) या मोठया भावाला राबोडी पोलिसांनी मंगळवारी पहाटेच्या सुमारास अटक केली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्यात वाद सुरु होता.
गाझी आणि मेहमूद हे दोघेही ठाण्याच्या आझादनगर येथील युनायटेड २१ या हॉटेलसमोर वास्तव्याला आहेत. दोघांमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून क्षुल्लक बाबींवरुन खटके उडत होते. याच वादाला कंटाळून मेहमूद ५ डिसेंबर रोजी पहाटे २ वाजण्याच्या सुमारास घराबाहेर पडला. धाकटा भाऊ घराबाहेर पडल्यामुळे मोठा पुन्हा त्याच्या मागे समजूत काढण्यासाठी बाहेर पडला. त्याने समजूत काढण्याऐवजी मेहमूदच्या डोक्यात लोखंडी रॉडने प्रहार केला. तसेच तोंडावर लाथाबुक्कयांनी मारहाण करुन त्याचा एक दात पाडला. त्यानंतर छातीवर पोटावरही त्याला जबर मारहाण केली. यात जखमी झालेल्या मेहमूदला नातेवाईकांनी ठाण्याच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. त्याच्यावर उपचार करण्यात येत आहेत. याप्रकरणी राबोडी पोलीस ठाण्यात हाणामारीचा गुन्हा दाखल झाला आहे. हल्ल्यानंतर पसार झालेल्या गाझीलाही पोलीस निरीक्षक दिलीप रासम यांच्या पथकाने सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास अटक केली. त्याच्याकडून लोखंडी रॉडही पोलिसांनी जप्त केला आहे. ठाणे न्यायालयाने त्याला ६ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. पोलीस उपनिरीक्षक महेश जाधव हे याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.
पत्नीही माहेरी गेली...
गाझीला दारुचेही व्यसन आहे. नशेतच त्याला भांडणाची सवय आहे. भावाप्रमाणेच पत्नीबरोबरही त्याचे अनेकदा भांडण झाले आहे. तिलाही तो दारुच्या नशेत मारहाण करीत होता. सततच्या भांडणाला कंटाळून तीही घर सोडून गेली आहे. यापूर्वीही त्याच्याविरुद्ध राबोडी पोलीस ठाण्यात मारहाणीच्या तक्रारी दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Web Title: The elder brother who came out of the house after a fight in Thane, hit his big tooth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.