ठाण्यात सुरु होणार इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशन
By admin | Published: May 10, 2017 12:02 AM2017-05-10T00:02:18+5:302017-05-10T00:02:18+5:30
शहरातील वाहतुकीमुळे होणारे प्रदूषण कमी करण्यासाठी इलेक्ट्रीक वाहनांचा वापर वाढविण्याच्या दृष्टीने ठाणे महापालिका प्रयत्न करीत
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : शहरातील वाहतुकीमुळे होणारे प्रदूषण कमी करण्यासाठी इलेक्ट्रीक वाहनांचा वापर वाढविण्याच्या दृष्टीने ठाणे महापालिका प्रयत्न करीत असून अशा वाहनांसाठी शहरात विविध ठिकाणी चार्जिंग स्टेशन उभी करण्याबाबत सर्वेक्षण सुरु केले आहे. याबाबत मंगळवारी महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या सोबत आंतरराष्ट्रीय वित्त संस्थांच्या प्रतिनिधींची बैठक होऊन लवकरात लवकर या प्रकल्पाची अंमलबजावणी करण्याबाबत निर्णय झाला. अशा पद्धतीचा प्रकल्प राबविणारी ठाणे ही देशातील पहिली मनपा आहे.
आंतरराष्ट्रीय वित्त संस्थांच्या सहकार्याने हा प्रकल्प राबविणार असून पेट्रोलपंपाच्या धर्तीवर शहरात विविध ठिकाणी इलेक्ट्रीक वाहन चार्जिंग स्टेशन्स उभी करण्यात येणार आहेत. ती कुठे उभी करता येतील याबाबत सर्वेक्षण सुरु केले असल्याची माहिती महापालिका आयुक्तांनी दिली.