तानाजी चित्रपटातील बदनामी करणाऱ्या आक्षेपार्ह भाग वगळण्यासाठी नाभिक समाजाचा एल्गार

By जितेंद्र कालेकर | Published: January 23, 2020 10:43 PM2020-01-23T22:43:32+5:302020-01-23T22:50:38+5:30

‘तानाजी’ चित्रपटामध्ये नाभिक समाजातील ‘चुलत्या’ हा उदयभानकडे चहाडया करतो, असे दर्शविण्यात आले आहे. या विकृत चित्रणातून नाभिक समाजाची बदनामी होत असून ही दृश्य चित्रपटातून तातडीने वगळण्यात यावीत, अशी मागणी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे राष्ट्रीय जनसेवा पक्षाने केली आहे.

Elgar of the Nabhik samaj to exclude the offending parts of the Tanaji movie | तानाजी चित्रपटातील बदनामी करणाऱ्या आक्षेपार्ह भाग वगळण्यासाठी नाभिक समाजाचा एल्गार

मुख्यमंत्र्यांकडे केली मागणी

googlenewsNext
ठळक मुद्देराष्ट्रीय जनसेवा पक्षाद्वारे नाभिक समाज काळया फिती लावून सरकारचा निषेध नोंदविणारमुख्यमंत्र्यांकडे केली मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: ‘तानाजी’ या हिंदी चित्रपटामध्ये चुलत्या च्या पात्राद्वारे चहाडखोर असे चित्रण नाभिक समाजाचे दाखविण्यात आले आहे. या विकृत चित्रणातून नाभिक समाजाची बदनामी होत असून ही दृश्य चित्रपटातून तातडीने वगळण्यात यावीत, अशी मागणी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे राष्ट्रीय जनसेवा पक्षाने केली आहे. सरकारचे या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी काळया फिती लावून २५ जानेवारी रोजी नाभिक समाजाच्या वतीने राज्यभर निषेध नोंदविण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रीय जनसेवा पक्षाचे अध्यक्ष महावीर गाडेकर आणि संपर्कप्रमुख संजय पंडित यांनी दिली.
‘तानाजी’ चित्रपटामध्ये नाभिक समाजातील ‘चुलत्या’ हा उदयभानकडे चहाडया करतो, असे दर्शविण्यात आले आहे. या बदनामीविरुद्ध मुख्यमंत्री ठाकरे यांना गुरुवारी निवेदन देण्यात आले आहे. भविष्यात अशा प्रकारचा अवमान नाभिक समाज कदापि सहन करणार नाही, असा इशाराही सरकारला देण्यात आला आहे. यासोबतच समाजाच्या इतरही प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यात आले आहे. नाभिक समाजाचा अनुसूचित जातीमध्ये समावेश करावा. अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्टचे संरक्षण मिळावे, स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ कार्यान्वित करावे, गटई कामगार धर्तीवर सलून व्यवसायिकाना टपरी योजना मंजूर व्हावी, असंघिटत कामगार योजने अंतर्गत शासनाच्या सर्व सवलती मिळाव्यात आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे अंगरक्षक वीर जिवाजी महाले यांच्या स्मारकाचे प्रतापगडावर भूमीपूजन करावे आदी मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्र्यांना देण्यात आले आहे. यावेळी अध्यक्ष गाडेकर यांच्यासह संजय पंडित, सचिव रमेश राऊत, सहसचिव गणेश क्षीरसागर आणि उपसंघटक सचिन गायकवाड आदी उपस्थित होते.

Web Title: Elgar of the Nabhik samaj to exclude the offending parts of the Tanaji movie

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.