प्रलंबित मागण्यांसह मनमानी विरोधात अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या कर्मचाऱ्यांचे ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन!
By सुरेश लोखंडे | Published: April 16, 2023 04:21 PM2023-04-16T16:21:33+5:302023-04-16T16:22:08+5:30
शिक्षकेतर कर्मचान्यांना किरकोळ रजा, कर्तव्य रजा, अर्जित रजा, वैद्यकिय रजा मिळावी.
ठाणे : शासनाच्या नियमाप्रमाणे शिक्षकेत्तर कर्मचान्यांना सातवा वेतन त्वरीत लागू करावा. पाचव्या आणि सहावा वेतन आयोगाचा फरक त्वरीत देण्यात यावा, वेळो वेळी लागू होणारा महागाई भत्ता त्वरीत देण्यात यावा आदी विविध प्रलंबित मागण्यांसाठी नवी मुंबईच्या ऐरोली येथील दत्ता मेघे अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या कर्मचाºयांनी रविवारी एकत्र येत ठाणे जिल्हाधािकरी कार्यालयाबाहेर धरणे आंदोलन छेडले.
राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघाच्या नेतृत्वाखाली या कर्मचाºयांनी संविधानिक पद्धतीने प्रलंबित मागण्यांसाठी येथील शासकीय विश्रामगृहाबाहरे एकत्र येऊन आंदोलन छेडले. रविवारच्या या एक दिवसीय धरणे आंदोलनाव्दारे दत्ता मेघे अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या कर्मचाºयांनी सातवा वेतन आयोग त्वरीत लागू करून दरमहा १ ते ७ तारखेच्या आत वेतन मिळावे आदी प्रमुख मागण्या लावून धरत प्रशासनाचे लक्ष वेधले. पाचव्या, सहाव्या वेतन आयोगाचा फरक त्वरीत देण्यात यावा. शासनाच्या नियमाप्रमाणे शिक्षकेत्तर कर्मचान्यांना सातवा वेतन लागू असताना सुध्दा या महाविद्यालयाकडून ९० ते ९५ टक्के महागाई भत्ता सहाव्या वेतन आयोगा प्रमाणे देत असल्याची मनमानी कर्मचाºयांनी यावेळी उघड केली.
शिक्षकेत्तर कर्मचाºयाच्या नेमणुकी आधी महाविद्यालयाने शासन नियमानुसार रिक्त जागा जाहिरात देऊन भरण्यात यावी. महाविद्यालयाने तंत्र शिक्षण संचालनालयाच्या नियमांचे पालन करावे. शासकीय नियमानुसार सेवानिवृत्त शिक्षकेतर कर्मचाºयांना २० लाख रूपये ग्रॅच्युटी मिळायला पाहीजे. दरवर्षी वार्षिक वेतनवाढ देणे. गेल्या दोन वर्षांची वार्षिक वेतनवाढ त्वरीत द्यावी. सीएएस अंतर्गत पदोन्नती देण्यात यावी. शिक्षकेतर कर्मचान्यांना किरकोळ रजा, कर्तव्य रजा, अर्जित रजा, वैद्यकिय रजा मिळावी.उन्हाळी व हिवाळी दीर्घ मुदतीच्या रजा मिळाव्यात. कोरोना काळात कर्मचान्यांचे रोखलेले वेतन मिळावे आदी मागण्यांसाठी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर या कर्मचाºयांनी तीव्र आंदोलन करून महाविद्यालयाची मनमानीही उघड केली.