स्वातंत्र्य दिनानिमित्त बालसुरक्षा समितीची स्थापना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2021 04:46 AM2021-08-17T04:46:20+5:302021-08-17T04:46:20+5:30
उल्हासनगर : स्वातंत्र्य दिनानिमित्त सम्राट अशोकनगरमध्ये नगरसेविका सविता तोरणे रगडे यांच्या अध्यक्षतेखाली बालसुरक्षा समितीची स्थापना करण्यात आली. समितीमुळे लहान ...
उल्हासनगर : स्वातंत्र्य दिनानिमित्त सम्राट अशोकनगरमध्ये नगरसेविका सविता तोरणे रगडे यांच्या अध्यक्षतेखाली बालसुरक्षा समितीची स्थापना करण्यात आली. समितीमुळे लहान मुलांच्या विविध समस्यांकडे लक्ष जाणार असून विविध उपाययोजना करण्यात येणार असल्याची माहिती समाजसेवक शिवाजी रगडे यांनी दिली.
लहान मुलांच्या अनेक समस्या असून त्याकडे गंभीरतेने लक्ष दिले जात नाही. अनेक मुलांना पालक नसल्याने बालकामगार, बालविवाह, लैंगिक अत्याचार, एकल पालकत्व व आर्थिक परिस्थितीमुळे मुलांच्या शिक्षणावर परिणाम होतो. यासाठी राज्य सरकारने सन २०१४ मध्ये आदेश काढून वॉर्ड पातळीवर बालसुरक्षा समिती स्थापन करण्याचे सांगितले होते. अशा मुलांना निवारा व सुरक्षा उपलब्ध होण्यासाठी समाजसेवक शिवाजी रगडे प्रयत्न करणार आहेत. यापूर्वी त्यांनी बालकल्याण समितीच्या सहकार्याने टायगर प्रकरण यशस्वीरीत्या हाताळले. बालकल्याण समितीच्या सहकार्याने स्वातंत्र्यदिनी सम्राट अशोकनगरमध्ये वॉर्ड बालसुरक्षा समिती स्थापन केली.
कार्यक्रमाला बालसुरक्षा समितीच्या अध्यक्ष नगरसेविका सविता तोरणे-रगडे, रिपाइं नेते महादेव सोनवणे, मध्यवर्ती पोलीस ठाण्याच्या पोलीस अधिकारी दीपाली वाघ, डॉ. भूमिका गिरी, मुख्याध्यापक मीनाक्षी सोनवणे, समाजसेवक शिवाजी रगडे उपस्थित होते.