असफलता मिळाली तरी नाराज न होता पुन्हा प्रयत्न करावा  :  तरूण पिढीला  मॅनेजमेंट गुरूनी दिला संदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2020 05:43 PM2020-09-22T17:43:13+5:302020-09-22T17:47:16+5:30

ब्रह्मांड कट्टयावर "चरण या आचरण" या विषयावर व्याख्यान संपन्न झाले. 

Even if you fail, you should try again without getting upset: The message given by the management guru to the younger generation | असफलता मिळाली तरी नाराज न होता पुन्हा प्रयत्न करावा  :  तरूण पिढीला  मॅनेजमेंट गुरूनी दिला संदेश

असफलता मिळाली तरी नाराज न होता पुन्हा प्रयत्न करावा  :  तरूण पिढीला  मॅनेजमेंट गुरूनी दिला संदेश

Next
ठळक मुद्देअसफलता मिळाली तरी नाराज न होता पुन्हा प्रयत्न करावा तरूण पिढीला  मॅनेजमेंट गुरूनी दिला संदेशब्रह्मांड कट्टयावर "चरण या आचरण" या विषयावर व्याख्यान संपन्न

ठाणे: आजची तरूण पिढी ही अत्यंत बुद्धिमान आहे. त्यांना पालकांनी सगळ्या सोयी सुविधा उपलब्ध करुन दिलेल्या आहेत आणि देणार आहेत. त्यांनी आपले कर्तव्य, अध्ययन जबाबदारी ओळखून करणे आवश्यक आहे. त्यातून जर असफलता मिळाली तरी नाराज न होता  पालकांच्या मदतीने पुन्हा प्रयत्न करावा असा सल्ला  मॅनेजमेंट गुरू तथा मोटीवेशन स्पीकर दिनेश व्यास यांनी दिला. ब्रह्मांड कट्टयावर  मॅनेजमेंट गुरू तथा मोटीवेशन स्पीकर दिनेश व्यास यांचे "चरण या आचरण" या विषयावर हिंदी भाषेतील व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.

आजच्या भेडसावत असलेल्या समस्या व त्यावरील उपाय आणि समाधान यावर त्यांनी मार्गदर्शन केले. चरण व आचरण या बाबत बोलताना ते म्हणाले चरण म्हणजे वैयक्तिक आणि आचरण म्हणजे वागणूक या दोन्ही गोष्टी एकमेकांना पुरक आहेत. आपल्या नियमित सुखकर आयुष्यात एखादी वेगळी परिस्थिती निर्माण होते व त्यामुळे जी गडबड होते ती समस्या. त्या समस्येचा विचार करून योग्य तो मार्ग काढल्यामुळे मिळते ते समाधान. समस्या सोडविण्यासाठी आपण महान व्यक्तींना आठवून त्यांच्या विचाराने प्रभावित होतो. हेच विचार आपले व्यक्तिमत्व घडवते. म्हणजेच आपल्या वागणुकीमुळे घडते ते आपल व्यक्तिमत्व चरण  व नंतर प्राप्त होते ते समाधान म्हणजे  आचरण. हा आपल्या समस्येचा व समाधानाचा गुंता दिनेश व्यास यांनी उलगडून सांगितला. आपल्याला समजलेल्या विचारांचा लाभ इतरांना होण्यासाठी आपण पुढील व्यवस्था केली जाते. व्यक्ति,विचार व व्यवस्था हे एक चक्र आहे. त्यावेळी आपण व्यक्ती व विचार याचे आपण आचरण करतो असे ते पुढे म्हणाले. 

           समस्या व समाधान या बाबत ते म्हणाले, समस्या ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या असतात. कालची समस्या ही आजची असेलच असे नाही. समस्या कुठल्या स्वरुपात आहे याचा विचार करायला पाहिजे.  समस्येच स्वरूप जाणून घेणे आवश्यक आहे कारण त्यातूनच मार्ग निर्माण होतात. त्यानंतर मिळते ते समाधान. काम,कर्तव्य करणे आवश्यक आहे पण त्या पासून होणाऱ्या फायदा यावर आपला अधिकार असतोच असे नाही. आपण कर्तव्य करत असताना फळाची अपेक्षा करावी पण जेंव्हा आपण आपली जबाबदारी ओळखून कर्म करतो त्यावेळी फळ निश्चित मिळते आणि लाभते ते समाधान. म्हणजेच समस्या आणि समाधान म्हणजेच आचरण हे पुन्हा एकदा सिद्ध केले. आसक्ती हे समस्येचे मूळ कारण आहे . वाचन, ऐकणे, लिखाण यातूनच बुध्दी प्रगल्भ होते व एकाग्रता वाढते विचार करण्याची शक्ती वाढते आसक्ती वर नियंत्रण मिळवता येते. यातूनच निर्माण होते एक सुंदर व्यक्तिमत्व व आयुष्यात मिळते समाधान. अशा प्रकारे व्यास यांनी "चरण या आचरण " या विषयाची सांगता केली. 

             कोरोनाच्या महामारी मुळे निर्माण  झालेल्या  परिस्थितीमुळे ब्रह्मांड कट्टा ऑनलाईन लाईव्ह कार्यक्रम सादर करीत आहेत सदरचा ब्रह्मांड कट्टा हा पाचवा होता. कार्यक्रमाच्या सुरवातीला गायक जितेंद्र तांबे यांनी "कही दूर जब दिन ढल जाये " व"मेरे दिलने तडपते जब नाम तेरा पुकारा " ही दोन गाणी गाऊन संगीतमय वातावरण निर्माण केले. कार्यक्रमाचे आयोजक संस्थापक राजेश जाधव यांनी पाहुण्यांचा परिचय व स्वागत केले तर आभार अध्यक्ष महेश जोशी यांनी मानले.

Web Title: Even if you fail, you should try again without getting upset: The message given by the management guru to the younger generation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.