ठाण्यात मनसेने भरवले ५०० खड्ड्यांचे प्रदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2021 04:44 AM2021-09-25T04:44:16+5:302021-09-25T04:44:16+5:30

ठाणे : पावसाळ्यात दरवर्षी खड्ड्यांचा प्रश्न ऐरणीवर येतो. घोडबंदर परिसरात तसेच पुलावरील खड्ड्यांमुळे अनेक बळी गेले आहेत. काही दिवसांपूर्वी ...

Exhibition of 500 pits filled by MNS in Thane | ठाण्यात मनसेने भरवले ५०० खड्ड्यांचे प्रदर्शन

ठाण्यात मनसेने भरवले ५०० खड्ड्यांचे प्रदर्शन

Next

ठाणे : पावसाळ्यात दरवर्षी खड्ड्यांचा प्रश्न ऐरणीवर येतो. घोडबंदर परिसरात तसेच पुलावरील खड्ड्यांमुळे अनेक बळी गेले आहेत. काही दिवसांपूर्वी घोडबंदर रोडवरील खड्ड्यांमुळे एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. महापालिकेच्या निकृष्ट दर्जाच्या कामाचा निषेध आणि खड्ड्यांमुळे झालेल्या अपघातात बळी गेलेल्या तरुणाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ५०० खड्ड्यांच्या प्रदर्शनाच्या माध्यमातून शुक्रवारी श्रद्धांजली वाहिली.

ठाणे शहरातील घोडबंदर रोड, वागळे इस्टेट, वर्तकनगर, माजिवडा, बाळकुम, कोपरी परिसरात रस्त्यांची अक्षरश: चाळण झाली आहे. दरवर्षी ठाणे महापालिका कोट्यवधी रुपयांचे टेंडर काढूनही खड्ड्यांची परिस्थिती तशीच आहे. ठाण्यातील बहुतेक मुख्य रस्त्यांवर तसेच एमएमआरडीएने बांधलेल्या उड्डाणपुलांवर मोठ्या प्रमाणावर खड्डे झाले आहेत. त्यामुळे नागरिकांना वाहतूककोंडीला सामोरे जावे लागते. विशेष म्हणजे पालकमंत्री, आयुक्त आणि महापौरांच्या निवास परिसरातील रस्त्यांची दुरवस्था दिसून येते. प्रशासन आणि लोकप्रतिनिधींच्या घरासमोर रस्त्यांची दुरवस्था असतानाही यावर कोणतीच उपाययोजना केली जात नाही हेच ठाणेकरांचे दुर्दैव आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार रस्त्याच्या डागडुजीकरिता पेव्हर ब्लॉकचा उपयोग करू शकत नसतानाही, आजही महामार्गावरील काही खड्डे बुजविण्यासाठी त्यांचा बिनदिक्कत उपयोग केला जात आहे.

मनसेच्या वतीने ठाण्यातील वेगवेगळ्या ठिकाणी असलेल्या खड्ड्यांचे प्रदर्शन शुक्रवारी आर्ट गॅलरीमध्ये भरविले होते. देवेंद्र कदम, मनीष सावंत, स्वप्निल गुरव, संतोष कांबळे, आशिष डोळे, कृष्णा शर्मा यांनी यासाठी विशेष मेहनत घेतली.

* ठाणे शहरातील खड्डे लवकरात लवकर बुजविले गेले नाहीत, तर या खड्ड्यांसाठी जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांना धडा शिकवून तीव्र आंदोलन करण्यात येईल.

- स्वप्निल महिंद्रकर, शहर अध्यक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, जनहित व विधि विभाग, ठाणे

.....................

Web Title: Exhibition of 500 pits filled by MNS in Thane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.