ठाणे जिल्ह्यातील युवा - युवतींसाठी नवीन मतदार नोंदणीचा कालावधी १५ डिसेंबरपर्यंत वाढविला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2017 06:35 PM2017-12-02T18:35:36+5:302017-12-02T18:37:02+5:30

ठाणे जिल्ह्यातील युवा - युवतींसाठी जिल्हयातील १८ विधानसभा मतदार संघातील मतदान केंद्रस्तरीय अधिकारी घरोघरी भेटी देऊन मतदारांची पडताळणी नविन नाव नोंदणी व स्थलांतरित , मयत मतदारांची वगळणी बाबतची कार्यवाही करण्यात आलेली आहे.

The extension of new voter registration for youths in Thane district has been extended till December 15 | ठाणे जिल्ह्यातील युवा - युवतींसाठी नवीन मतदार नोंदणीचा कालावधी १५ डिसेंबरपर्यंत वाढविला

ठाणे जिल्ह्यातील युवा - युवतींसाठी नवीन मतदार नोंदणीचा कालावधी १५ डिसेंबरपर्यंत वाढविला

googlenewsNext
ठळक मुद्दे१८ ते २१ वयोगटातील तरुणांनी, नवविवाहीत महिलांनी आपले नाव मतदार यादीत जिल्हयातील १८ विधानसभा मतदार संघातील मतदान केंद्रस्तरीय अधिकारी घरोघरी नविन नाव नोंदणी व स्थलांतरित , मयत मतदारांची वगळणी बाबतची कार्यवाही

ठाणे : नवीन मतदार नोंदणीचा कालावधी १५ डिसेंबरपर्यंत वाढविण्यात आला आहे अशी माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी फरोग मुकादम यांनी दिली.

  ठाणे जिल्हयातील सर्व मतदारांनी व विशेषत: १८ ते २१ वयोगटातील तरुणांनी, नवविवाहीत महिलांनी आपले नाव मतदार यादीत आहे किवा नाही याची खात्री करुन जर मतदार यादीत नाव नसेल तर नावाची नोंदणी मतदार यादीमध्ये करण्यात यावी असे याव्दारे  ठाणे जिल्हा निवडणूक अधिकारी यांचे मार्फत आवाहन करण्यात येत आहे.

 भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार  १ जानेवारी या अर्हता दिनांकावर आधारित मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत जास्तीत जास्त पात्र मतदारांची नोंदणी व्हावी, मतदार यादी जास्तीत जास्त अचूक होण्यासाठी व मतदारांना मतदान विषयक चांगल्या सुविधा देता याव्यात याकरिता  जिल्हयातील १८ विधानसभा मतदार संघातील मतदान केंद्रस्तरीय अधिकारी घरोघरी भेटी देऊन मतदारांची पडताळणी नविन नाव नोंदणी व स्थलांतरित , मयत मतदारांची वगळणी बाबतची कार्यवाही करण्यात आलेली आहे. निवडणूक आयोगाने सदर कार्यक्रमांतर्गत दावे व हरकती स्विकारण्याचा कालावधी १५ डिसेंबरपर्यंत वाढविला आहे.

               सदर कार्यक्रमांतर्गत जास्तीत जास्त पात्र मतदारांची नोंदणी व्हावी, मतदार यादी जास्तीत जास्त अचूक होण्यासाठी व मतदारांना मतदान विषयक चांगल्या सुविधा देता याव्यात याकरिता  घरोघरी भेटी देऊन मतदारांची पडताळणी नविन नाव नोंदणी व स्थलांतरित , मयत मतदारांची वगळणी बाबतची कार्यवाही करण्यात येणार आहे. 

Web Title: The extension of new voter registration for youths in Thane district has been extended till December 15

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.