अंबरनाथ: अंबरनाथ नगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने तयार केलेल्या प्रारूप मतदार यादीवर मोठ्या प्रमाणात हरकती आल्याने आता त्यावर योग्य कार्यवाहीसाठी जिल्हाधिकाऱ्यांनी पंधरा दिवसाचा अवधी वाढवून दिला आहे
या मतदार यादीवर हरकती घेण्याची मुदत २२ फेब्रुवारीपर्यंत होती. मात्र, या कालावधीत शेकडो हरकती आल्याने त्यावर योग्य कार्यवाहीसाठी संबंधित अधिकाऱ्याला मतदाराच्या ठिकाणी जाऊन स्थळपाहणी करणे बंधनकारक झाले होते. परंतु, मतदार यादी निश्चित करण्यासाठी जो कालावधी दिला होता तो अपुरा पडत असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी आता हरकतींचे प्रमाण पाहून योग्य कार्यवाहीसाठी ही मुदतवाढ दिली आहे . जी मतदार यादी एक मार्च रोजी प्रसिद्ध करण्याचे आदेश होते ती आता १५ मार्च रोजी प्रसिद्ध केली आहे. तर प्रभागातील बूथनिहाय मतदार यादी तयार करण्यासाठी ८ मार्च ही तारीख निश्चित केली होती. मात्र त्यातदेखील बदल करून आता ती प्रसिद्ध करण्याची मुदत ३१ मार्च केली आहे. मतदार यादीचा कार्यक्रम पुढे सरकल्याने आता निवडणुकीच्या कार्यक्रमाबाबत देखील संभ्रम निर्माण झाला आहे
----------