फायनन्स कंपनीचा कर्ज हप्ता भरण्याचा तगादा: महिला बचत गटाच्या मदतीला मनसे सरसावली

By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2020 03:20 PM2020-10-01T15:20:34+5:302020-10-01T15:21:49+5:30

Ulhasnagar MNS News: उल्हासनगरात महिला बचत गटाच्या महिला रस्त्यावर

Finance Company demand for loan installment: MNS Help aid of women's self-help group | फायनन्स कंपनीचा कर्ज हप्ता भरण्याचा तगादा: महिला बचत गटाच्या मदतीला मनसे सरसावली

फायनन्स कंपनीचा कर्ज हप्ता भरण्याचा तगादा: महिला बचत गटाच्या मदतीला मनसे सरसावली

googlenewsNext

उल्हासनगर : लॉकडाऊन दरम्यान सर्व कामे ठप्प पडली असताना खासगी फायनान्स, पतपेढ्यांकडून कर्ज हफ्ते वसुलीसाठी बचत गटाच्या महिलांना तगादा लावल्याने त्या रडकुंडीला आल्या आहेत. अखेर त्यांच्या मदतीला मनसेचे शहर संघटक मैनुद्दीन शेख यांच्यासह अन्य पदाधिकारी मदतीसाठी धावले असून त्यांनी प्रांत अधिकारी यांच्यासह पोलीस उपायुक्त यांना निवेदन दिले आहे.

 उल्हासनगरात महिला बचत गटाची संख्या मोठी असून त्यापैकी बहुतांश बचत गटांनी खाजगी फायनान्स कंपनी, पतपेढी, बँक यांच्याकडून लहान - मोठा व्यवसाय करण्यासाठी कर्ज घेतले. लॉकडाऊन काळात सर्वच व्यवसाय ठप्प पडल्याने बचत गटाचे कामही बंद झाली. त्यामुळें त्यांना कर्ज हप्ते भरण्यास अडचण जाणवू लागली. शासन आदेश प्रमाणे ३१ आॅगस्ट महिन्या पर्यंत कर्ज हप्त्याची वसूल करण्यास बँक, खाजगी फायनान्स कंपनी, पतपेढी यांना मनाई केली होती. त्यामुळे नागरिकांसह बचत गटाच्या महिलांना दिलासा मिळाला होता. मात्र त्यानंतर खाजगी फायनान्स कंपनीसह पतपेढी, बँक आदींनी कर्ज हप्ते भरण्याचा तगादा लावला. या प्रकाराने बचत गटाच्या महिला मध्ये असंतोष निर्माण झाला. सदर प्रकार मनसेचे शहर संघटक मैनुद्दीन शेख यांच्याकडे गेल्यावर त्यांनी बचत गटाच्या महिलांना विश्वासात घेवून प्रांत अधिकारी व पोलिस उपायुक्त यांना निवेदन दिले. हाताला काम नाही, उद्योग बंद आदींमुळे कर्जाचे हप्ते भरण्याला वेळ देण्याची मागणी निवेदनात मैनुद्दीन शेख यांनी निवेदनात केली आहे. 

प्रांत कार्यालयाला निवेदन देताना बचत गटातील शेकडो महिला कार्यालयात आल्या होत्या. यावेळी शहर संघटक मैनुद्दीन शेख, पक्षाचे पदाधिकारी प्रवीण माळवे, काळू थोरात, बादशहा शेख, अक्षय धोत्रे, जाफर शेख, मॅक्स लोखंडे आदीसह मनसेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. बचत गटाच्या महिलांना न्याय मिळाला पाहिजे. नाहीतर इतरांप्रमाणे यांनाही सानुग्रह अनुदान देण्याची मागणी मैनुद्दीन शेख यांनी केली.

Web Title: Finance Company demand for loan installment: MNS Help aid of women's self-help group

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.