आग लागली की लावली?

By Admin | Published: March 3, 2016 02:04 AM2016-03-03T02:04:30+5:302016-03-03T02:04:30+5:30

नंडोरे येथील महाराष्ट्र राज्य वखार महामंडळच्या गोदामाला काल रात्री लागलेल्या आगीत विक्रीकर विभागाच्या (सेल टॅक्स विभागच्या) हजारो फायली जळून खाक झाल्या आहेत.

The fire was light? | आग लागली की लावली?

आग लागली की लावली?

googlenewsNext

हितेन नाईक,  पालघर
नंडोरे येथील महाराष्ट्र राज्य वखार महामंडळच्या गोदामाला काल रात्री लागलेल्या आगीत विक्रीकर विभागाच्या (सेल टॅक्स विभागच्या) हजारो फायली जळून खाक झाल्या आहेत. या दरम्यान गोदामाच्या पाठीमागे पेट्रोलने भरलेली बाटली मिळाल्याने ही आग हेतूपुरस्सर लावण्यात आल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे एखाद्या घोटाळ्यातील वादग्रस्त पुरावे नष्ट करण्यासाठीच तर ही आग लावली नाही ना, असा संशय व्यक्त केला जात आहे.
पालघर मनोर रस्त्यावरील कृषि उत्पन्न बाजार समितीच्या बाजूला महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाचे गोदाम असून या गोदामात डिसेम्बर २०११ पासून सेल्स टॅक्स विभागाने आपल्या सन २००५ पासूनच्या जुन्या हजारो महत्वपूर्ण फायली १२ रुपये ६५ पैसे प्रती चौ. फुट दराने भाड़े तत्वावर ठेवल्या होत्या. तर दुसऱ्या बाजूला शालेय पोषण आहार योजने च्या इस्कॉन चा २ हजार ४९८ पोती तांदूळ मागील दीड वर्षांपासून ठेवण्यात आल्याची माहिती वखार महामंडळाचे कनिष्ठ अधिक्षक विवेक खैरे यांनी दिली.
काल रात्री ७.५० वाजता वखारीला आग लागल्या नंतर एकच गोंधळ निर्माण झाला. ८ वाजून १७ मिनिटांनी पालघर नगर परिषदेच्या अग्निशमन विभागला कळविण्यात आले. त्यांनी तत्काल आगीवर पाण्याचा मारा सुरु केला. परंतु या गोदामाच्या दोन्ही बाजूने आग लागल्याने व एका बाजूला इस्कॉनच्या तांदळचा मोठा साठा असल्याने तो वाचविणे महत्वाचे होते. या वेळी लीडिंग फायरमेन अभिषेक गावंनकर, कानीफनाथ आरेकर, रुचित दवणे, नितेश भोईर, तेजस तांडेल, विकास गावित, निकेत पाटिल, योगेश दिवा, गणेश दिवा, शरद तांडेल इ. टीमने प्रयत्नांची शर्थ करुन शटर तोडून आत प्रवेश करुन आगीवर नियंत्रण मिळविले. त्यानंतर एमआयडीसीतून रात्री ११ वाजता अग्निशमनच्या दोन गाडया आल्यात. नंतर आगीवर बऱ्यापैकी नियंत्रण मिळविणे शक्य झाले.
वखारीला आग लागल्या नंतर पालघरचे अप्पर पोलिस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, उपविभागीय पोलिस अधिकारी जयंत बजबले इ.नी घटना स्थळी भेट दिली असता या वखारीमध्ये विद्युत पुरवठा नसतांना आग कशामुळे लागली हा प्रश्न पोलिसांना भेडसावत असतांनाच त्यांना अर्धा लीटर पेट्रोलची बाटली घटनास्थळी सापडल्याने ही आग कोणीतरी हेतुपुरस्सर लावली असावी या संशयाला बळकटी मिळते आहे. दुपारी ३.३० वाजे पर्यंत आग धुमसत होती.
सेल्स टॅक्स विभागाच्या माझगांव, ठाणे, पालघर इ. कार्यालयाच्या सन २००५ दरम्यांनच्या विविध प्रकारच्या फाइल्स ठेवण्यात आल्या होत्या. काल सेल्स टॅक्सच्या २ अधिकाऱ्यांनी या वखारीला संध्याकाळी भेट ही दिल्यानंतर ही माहिती पुढे येत असून त्या नंतर सुरक्षा रक्षक ठेवण्याची काळजी घेतली नसल्याने या प्रकरणातील बेपर्वाई दिसून येत आहे. या प्रकरणी वखार महामंडळ आणि सेल्स टॅक्स विभाग एकमेकाकड़े बोट दाखविण्यात धन्यता मानीत आहेत. त्यामुळे ही आग लावण्या मागे कुणाचा काही हेतू होता का? या फाइलींमधील माहितीमुळे एखादा अधिकारी अथवा क्लायंट अडचणीत येणार होता का?, एखादा गैरव्यवहार उघडकीस येणार होता का? असे प्रश्न समोर येत आहेत.

Web Title: The fire was light?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.