भिवंडी: तालुक्यातील काल्हेर गावात दुर्गेश पार्क समोरील माने इस्टेटमधील नॅनसे अॅण्ड सन्सच्या गोदामातील रेड कार्पेटला मंगळवार रोजी दुपारी आग लागली. या भिषण आगीचे कारण समजू शकले नाही.दुर्गेशपार्क समोर असलेल्या पार्वती कमर्शियल कॉम्प्लेक्समध्ये नॅनसे अॅण्ड सन्स नावाचे रेड कार्पेट आणि पुठ्यांचे गोदाम आहे. या गोदामातील मालास आज मंगळवार रोजी दुपारी ३-३० वाजताच्या सुमारास आग लागली. ही माहिती मिळताच घटनास्थळी मनपाच्या अंजूरफाटा फायरस्टेशनचे जवान अग्निशमकदलाच्या गाडीसह घटनास्थळी पोहोचले. तसेच ठाण्यातील बाळकुम व वागळे इस्टेट अग्निशामक दलाच्या मिळून दोन गाड्या घटनास्थळी पोहोचल्या. परंतू गाड्यांना आजूबाजूच्या ठिकाणाहून वेळेवर पाणीपुरवठा होत नसल्याने आग सायंकाळी ६ वाजेपर्यंत नियंत्रणांत आली नव्हती. तीन गाड्यांचे जवान आग नियंत्रणांत आणण्याचे शर्थीचे प्रयत्न करीत होते. पाण्याच्या कमतरतेमुळे आग विझविण्यास उशीर लागू शकतो, अशी माहिती प्रभारी आग्निशामक दल अधिकारी अमोल किणी यांनी दिली.या गोदामात आगप्रतिबंधक साधने अथवा साहित्य नसल्याने केवळ पाण्याने आग विझविण्याचे प्रयत्न सुरू होते. आगीत लाखो रूपयांचे साहित्य जळाले असून आगीचे कारण समजू शकले नाही.या प्रकरणी नारपोलीस पोलीस ठाण्यात जळीत रजीस्टर मध्ये नोंद करण्यात आली.
भिवंडीत रेड कार्पेटच्या गोदामास आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2018 8:23 PM
भिवंडी : तालुक्यातील काल्हेर गावात दुर्गेश पार्क समोरील माने इस्टेटमधील नॅनसे अॅण्ड सन्सच्या गोदामातील रेड कार्पेटला मंगळवार रोजी दुपारी ...
ठळक मुद्देगोदामातील रेड कार्पेटला लागली आग काल्हेरमध्ये नॅनसे अॅण्ड सन्सचे गोदाम पाण्याच्या कमतरतेमुळे आग विझविण्यास उशीर