वनधन केंद्रांना दिले फ्लाेरिकल्चरसंबंधी प्रशिक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2021 04:39 AM2021-07-31T04:39:35+5:302021-07-31T04:39:35+5:30
किन्हवली : महाराष्ट्रात प्रथमच दिल्ली येथील शास्त्रज्ञांनी जनजाती कार्य मंत्रालय, भारत सरकार यांच्या मार्गदर्शनाखाली एकात्मिक सामाजिक संस्था, शहापूर संचालित ...
किन्हवली : महाराष्ट्रात प्रथमच दिल्ली येथील शास्त्रज्ञांनी जनजाती कार्य मंत्रालय, भारत सरकार यांच्या मार्गदर्शनाखाली एकात्मिक सामाजिक संस्था, शहापूर संचालित वनधन विकास केंद्र या ठिकाणी फ्लाेरिकल्चरसंदर्भात वनधन केंद्रांवर २९ व ३० जुलैला दोन दिवसांचे प्रशिक्षण शिबिर पार पडले. यावेळी फुलांपासून विविध वस्तू कशा तयार करायच्या व त्यांची विक्री कशी करायची, याबाब प्रशिक्षण देण्यात आले.
सीएसआयआर फ्लोरिकल्चर मिशनचे महाराष्ट्र राज्य समन्वयक डॉ. विजय विशू वाघ आणि डॉ. के. जे. सिंह या ज्येष्ठ वैज्ञानिकांनी फ्लोरिकल्चर मिशनचे महत्त्व उपस्थितांना पटवून दिले. या प्रशिक्षणात प्राध्यापक डॉ. अतुल बत्रा यांनी ‘डिहायड्रेटेड फ्लोरल क्राफ्ट’चे प्रात्यक्षिक दिले. प्राध्यापक डॉ. सतीश कुमार यांनी झेंडूच्या लागवडीबद्दल मार्गदर्शन करून झेंडूच्या बियांचे वाटप केले. हे प्रशिक्षण आ. ए. सा. संस्थेच्या शहापूरमधील कार्यालयात पार पडले. या प्रशिक्षणासाठी सुनील पवार, ठाणे-बोरिवली पालघर पतसंस्थेचे अधीक्षक अरुण पानसरे, कर्मचारी व प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.