भिवंडीतील उड्डाणपुल बुधवारपासून दुरुस्तीसाठी दोन महिने राहणार बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2021 06:45 PM2021-10-12T18:45:26+5:302021-10-12T18:45:44+5:30
उड्डाण पुलाची दुरूस्तीचे काम बुधवार पासून हाती घेण्यात आले असल्याने बुधवार पासून पुढील दोन महिने हा उड्डाणपूल राहदरीसाठी बंद करण्यात आला येणार आहे.
- नितिन पंडीत
भिवंडी- भिवंडीतील स्व. राजीव गांधी उड्डाण पुलाची सध्या प्रचंड दुरावस्था झाली आहे. त्यामुळे या उड्डाणपुलावरून प्रवास करतांना नागरिकांना अनेक अडचणी येत होत्या तर उड्डाणपुलावर पडलेल्या खड्डयांमुळे अनेक अपघात देखील होत होते. याबाबत स्थानिक नागरिकांसह दै. लोकमतने देखील आवाज उठविला होता. अखेर बातम्या व नागरिकांच्या समस्येकडे मनपा प्रशासनाचे लक्ष गेले असून भिवंडी मनपाने या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे.
या उड्डाण पुलाची दुरूस्तीचे काम बुधवार पासून हाती घेण्यात आले असल्याने बुधवार पासून पुढील दोन महिने हा उड्डाणपूल राहदरीसाठी बंद करण्यात आला येणार आहे. विशेष म्हणजे उड्डाणपूल दुरुस्तीला मुहूर्त मिळाल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे. मात्र दुरुस्तीचे काम योग्य व गुणवत्तापूर्वक करावे अशी मागणी नागरिक करीत असून उड्डाण पुल दुरुस्त होण्याच्या कामात नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन महापौर प्रतिभा पाटील यांनी नागरिकांना केले आहे.