पोलीस चौकी हलवल्याने सॅटिसखालील सुरक्षा वा-यावर, रिक्षाचालकांसह फेरीवाल्यांचे फावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2017 03:32 AM2017-10-23T03:32:12+5:302017-10-23T03:32:20+5:30

ठाणे : सॅटीस पुलाखाली असलेली वाहतूक शाखेची चौकी काही दिवसांपूर्वी अचानक हलवून ती थेट ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या मागील बाजूस नेली आहे.

Following the move of the Police Chowk, the security guard on Saturn, rickshaw pullers | पोलीस चौकी हलवल्याने सॅटिसखालील सुरक्षा वा-यावर, रिक्षाचालकांसह फेरीवाल्यांचे फावले

पोलीस चौकी हलवल्याने सॅटिसखालील सुरक्षा वा-यावर, रिक्षाचालकांसह फेरीवाल्यांचे फावले

Next

ठाणे : सॅटीस पुलाखाली असलेली वाहतूक शाखेची चौकी काही दिवसांपूर्वी अचानक हलवून ती थेट ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या मागील बाजूस नेली आहे. चौकी हलवल्याने सॅटीस पुलाखाली सीसीटीव्ही कॅमे-याची कंट्रोल रूमही बंद केल्याने ठाणे सॅटीस पुलाखालची सुरक्षा वाºयावर आली आहे. सध्या या रूमची जबाबदारी महापालिकेकडे सुपूर्द केली असली, तरी ती बंद आहे.
राजन विचारे आमदार असताना त्यांच्या निधीतून सॅटीसखाली सुरक्षिततेच्या दृष्टीने सीसीटीव्ही कॅमेरे बसवले होते. त्यांच्या कंट्रोल रूमचे उद्घाटन तत्कालीन शहर पोलीस आयुक्त के.पी. रघुवंशी यांच्या हस्ते झाले होते. दरम्यान, तेथे ठाणेनगर उपशाखेची चौकी सुरूकेली होती. त्यामुळे तेथील मुख्य रिक्षा स्टॅण्डवरील रिक्षाचालकांवर वाहतूक पोलिसांचे लक्ष राहत होते. तरीसुद्धा, या पुलाखाली वाहतूक पोलिसांसमोर रिक्षाचालकांचा बेशिस्तपणा जगजाहीर होता. त्यातच आता वाहतूक शाखेची चौकीच हलवल्याने रिक्षाचालकांची मनमानी वाढण्याची शक्यता आहे.
भाऊसाहेब गीते, सहायक पोलीस आयुक्त, वाहतूक शाखा,ठाणे यांनी सांगितले की, अपुºया जागेमुळे ठाणे स्टेशन परिसरातील ठाणेनगर वाहतूक उपशाखेची चौकी हलवली आहे. ती पोलीस मुख्यालयाच्या मागील बाजूस नेली आहे.
>चौकीसमोर फेरीवाले
सॅटीस पुलाखालील चौकीसमोरील काही परिसर मोकळा असायचा. त्यातच आता चौकी बंद असल्याचे पाहून त्यासमोरील मोकळ्या जागेवर फेरीवाल्यांनी आपले बस्तान मांडले.

Web Title: Following the move of the Police Chowk, the security guard on Saturn, rickshaw pullers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Policeपोलिस