भिवंडीतील मुंबई नाशिक महामार्गावर झालेल्या अपघात चौघांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2021 06:45 PM2021-02-01T18:45:10+5:302021-02-01T18:46:43+5:30

Accident : या अपघाताप्रकरणी बस चालकाने कार चालकावर कोनगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून या अपघाताचा पुढील तपास पोलीस उप निरीक्षक शेरखाने करीत आहेत. 

Four killed in Mumbai-Nashik highway accident in bhiwandi | भिवंडीतील मुंबई नाशिक महामार्गावर झालेल्या अपघात चौघांचा मृत्यू

भिवंडीतील मुंबई नाशिक महामार्गावर झालेल्या अपघात चौघांचा मृत्यू

Next
ठळक मुद्देगोकूळ मधुकर गवते ( वय २९ वर्ष, रा. तरुवाडे , पिंपळगाव निफाड, नाशिक ) , पंकज भागीरथ जावळे ( वय २९ रा. सिन्नर ) कार चालक ज्वालाविजय बहादूर सिंग ( वय २७ , रा. नाशिक)  गौरव सुधीर सिंग ( वय २७, रा. नाशिक ) असे अपघात मृत्यू झालेल्यांची नावे आहे.             

भिवंडी मुंबई-नाशिक महामार्गावर कार आणि खाजगी बसमध्ये झालेल्या भीषण अपघातातकारमधील चार जण ठार झाल्याची घटना भिवंडीतील पिंपळास गावाच्या हद्दीत सोमवारी पहाटे घडली आहे. याप्रकरणी कोनगाव पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे. गोकूळ मधुकर गवते ( वय २९ वर्ष, रा. तरुवाडे , पिंपळगाव निफाड, नाशिक ) , पंकज भागीरथ जावळे ( वय २९ रा. सिन्नर ) कार चालक ज्वालाविजय बहादूर सिंग ( वय २७ , रा. नाशिक)  गौरव सुधीर सिंग ( वय २७, रा. नाशिक ) असे अपघात मृत्यू झालेल्यांची नावे आहे.

 

मृतदेह ठेवले होते पलंगात लपवून; छत्तीसगडचे माजी मंत्री डी. पी. घृतलहरे यांच्या सुनेसह नातीची हत्या 

          

हे चौघेही नाशिकहुन ठाण्याकडे जात असताना मुंबई-नाशिक महामार्गावरील भिवंडी तालुक्यातील पिंपळास गावाजवळ आले असता कारचालकाचा गाडीवरून ताबा सुटला व कार रस्त्यामधील दुभाजकावर आदळून डिव्हायडर ओलांडून विरुद्ध दिशेला फेकल्या गेली. त्याचवेळेस मुंबईहून नाशिककडे जाणाऱ्या एका खाजगी बस आणि या कारमध्ये जोरदार धडक होऊन भीषण अपघात झाला. हा अपघातात एवढा भयंकर होता की, कारचा चेंदामेंदा होऊन कारमधील चार जण ठार झाले. या अपघाताप्रकरणी बस चालकाने कार चालकावर कोनगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून या अपघाताचा पुढील तपास पोलीस उप निरीक्षक शेरखाने करीत आहेत. 

Web Title: Four killed in Mumbai-Nashik highway accident in bhiwandi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.