फुकटचे ॲप्स शाळांसाठी ठरताहेत डोकेदुखी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2021 04:42 AM2021-08-26T04:42:56+5:302021-08-26T04:42:56+5:30

स्नेहा पावसकर ठाणे : गेल्या वर्षभरापासून शाळा ऑनलाइन सुरू आहेत. त्यामुळे विविध ॲप्सचा वापर करून मुलांना ऑनलाइनच शिक्षण दिले ...

Free apps are a headache for schools | फुकटचे ॲप्स शाळांसाठी ठरताहेत डोकेदुखी

फुकटचे ॲप्स शाळांसाठी ठरताहेत डोकेदुखी

Next

स्नेहा पावसकर

ठाणे : गेल्या वर्षभरापासून शाळा ऑनलाइन सुरू आहेत. त्यामुळे विविध ॲप्सचा वापर करून मुलांना ऑनलाइनच शिक्षण दिले जात आहे. मात्र, काही वेळा फुकटच्या या ॲपचा वापर करून ऑनलाइन वर्गामध्ये अश्लील व्हिडिओ किंवा मेसेजेस येण्याचे प्रकार काही शाळांमध्ये घडले आहेत. त्यामुळे ही फुकटचे ॲप्स शाळांसाठी एक प्रकारे डोकेदुखीच ठरले आहेत.

गेल्या वर्षी कोरोना आला आणि शाळा महाविद्यालये सारेच बंद झाले. मात्र, त्याला पर्याय म्हणून ऑनलाइन शाळा सुरू झाल्या. सुरुवातीला या ऑनलाइन शाळा कशा घ्यायच्या हा एक प्रश्नच होता, पण नंतर विविध ॲप्सचा वापर करून बहुतांश शाळांनी ऑनलाइन शिक्षण सुरू केले. आता शिक्षक, विद्यार्थी आणि पालकही या ऑनलाइन शिक्षण पद्धतीला रुळले आहेत; पण आता काही फुकटचे ॲप्स शिक्षणाच्या नावाखाली येऊ लागले आहेत. आणि त्यांचा वापर करून ऑनलाइन वर्गात अश्लील व्हिडिओ, अयोग्य भाषेतील मेसेजेस व्हायरल होण्याचे प्रकार घडू लागले आहेत. यामुळे मुलांच्या मनावर परिणाम होतो तसेच ऑनलाइन वर्गात मुलांमध्ये चलबिचलता येते.

----------

शाळांनी ऑनलाइन वर्गात विद्यार्थी म्हणजेच त्यांच्या पालकांना जॉइन करून घेताना एकाच पालकाला जॉइन होता येईल याची दक्षता घ्यावी. तसेच विद्यार्थ्यांच्या पालकांव्यतिरिक्त जर कुणी वेगळी व्यक्ती क्लासमध्ये जॉइन झालेली जाणवल्यास त्याला तत्काळ काढून टाकावे. ऑनलाइन वर्गांसाठीचे आयडी आणि पासवर्ड इतरत्र कुठेही जाणार नाहीत याची दक्षता घेण्याबाबत पालकांनाही सूचना कराव्यात, असे एका सायबर सेलच्या माजी अधिकाऱ्यांनी सांगितले.

-------

आजकालच्या मुलांना मोबाइलमधील सर्व ॲप्स हँडल करता येतात. अनेक मुलं ऑनलाइन शाळाही स्वतःच जॉइन करतात. काही पालक नोकरीनिमित्त बाहेर जाणारे असल्याने त्यांना मुलांच्या बाजूला बसून राहता येत नाही. मात्र, जेव्हा शक्य असेल किंवा ज्या पालकांना वेळ असेल त्यांनी आपला पाल्य काय करतो. मुले काही इतर ॲपवर जाऊन काही अयोग्य व्हिडिओ, मेसेजेस तर पाहत नाही ना यावर लक्ष ठेवण्याची गरज आहे.

Web Title: Free apps are a headache for schools

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.