कल्याण- नवीन गाडी घेवून ती कंपनीला लावत महिन्याला पैसे देण्याचे आमिष दाखवत एका तरुणाला भामट्याने लाखो रुपयांना गंडा घातल्याची घटना कल्याणमध्ये उघडकीस आली आहे. याप्रकरणी महात्मा फुले पोलीस स्थानकात तक्रार नोंदवण्यात आली होती. पोलीस भामट्याच्या मागावर होते. याच दरम्यान त्रस्त तरुणाने ज्या वेबसाईटच्या माध्यमातून हा भामट्या त्याच्या संपर्कात आला त्या वेबसाईटवर फेक अकाउंट उघडून आपल्या काही सहाकार्यांच्या मदतीने स्वतःच सापळा रचत हा भामट्याला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केलं. रोहित गायकवाड असं या भामट्याचे नाव असून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं आहे. विशेष म्हणजे या भामट्याने या आधीही अनेक जणांची फसवणूक केली असून फसवणूक झालेल्या या भामट्याला शोधण्यासाठी एक फ्रॉड नावाने व्हॉट्सअॅप ग्रुपदेखील बनवला होता.
कल्याण पश्चिमेकडील चिकनघर परिसरात राहणारा अर्पित कपूर हा आपल्या चारचाकी गाडी घेऊन ती एखाद्या कंपनीमध्ये लावून उत्पन्न मिळवण्याच्या विचारात होता. या साठी त्याने विविध वेबसाईट वर भेट देत माहिती जाणून घेत होता. याच दरम्यान एका वेबसाईटच्या माध्यमातून त्याची रोहित गायकवाड या भामट्याशी ओळख झाली. रोहितने अर्पितला तुला बँक कर्जकरून गाडी घेऊन देतो व ती कंपनी हॉटेलमध्ये लावून तुला महिन्याचे चांगले उत्पन्न मिळेल असे आमिष दाखवले .सुरुवातीला अर्पित ने याकडे दुर्लक्ष केलं. मात्र रोहितने वारंवार अर्पितशी संम्पर्क साधणं सुरूच ठेवत त्याला आमिश दाखवल्याने अखेर हरप्रित या आमिशला बळी पडला त्याने ऑक्टोम्बर महिन्यात दोन टप्प्यात रोहितला सुमारे 1 लाख 8 हजार रुपये दिले .मात्र दोन महिन्यांच्या कालावधी लोटूनही गाडी बाबत काहीच हालचाल न दिसून आल्याने अर्पितला संशय आला. त्याने याबाबत रोहितशी संपर्क साधला असता त्याने उडवा उडवीची उत्तरे दिली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने त्याने प्रकरणी महात्मा फुले पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली .या तक्रारी नुसार पोलिसांनी रोहित गायकवाड या भामट्या शोध सुरू केला .मात्र पोलीस तपास सुरू असतानाच अर्पितला या भामट्याने अजून काही जणांची अशाच प्रकारे फसवणूक केल्याचे समजलं. त्याने या सर्व फसवणूक झालेल्याचा त्याने एक फ्रॉड नावाने व्हॉट्सअॅप ग्रुप तयार केला.या ग्रुपच्या माध्यमातून या भामट्याला शोधण्याचं काम सुरू केलं .ज्या वेबसाईटच्या माध्यमातून या भामट्याशी त्याचा संपर्क झाला होता या वेबसाईटवर फेक खातं तयार केलं होतं. त्याच्यामाध्यमातून त्याने अर्पितला जाळ्यात अडकवलं होतं. पोलिसानी रोहितला अटक करत त्याने आणखी किती जणांनी फसवणूक केली आहे याचा तपास सुरू केली आहे. दरम्यान, मुंबई येथील वाकोला ला राहणारा रोहित गायकवाड गुन्ह्याची कबुली दिली आहे