चॅनलवर मालिकांची दाखविली जाणारी व्हरायटीज हे उद्याचे भविष्य आहे - भीमराव मुडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2018 04:27 PM2018-02-19T16:27:05+5:302018-02-19T16:30:29+5:30
अभिनय कट्टा ही एकमेव चळवळ आहे जी जास्त संख्येने रसिकांच्या उपस्थितीत सुरू असते असे गौरवोद्गार भीमराव मुडे यांनी ठाण्यात काढले.
ठाणे: चॅनलवर मालिकांची दाखविली जाणारी व्हरायटीज हे उद्याचे भविष्य आहे. आता ही व्हरायटीज प्रत्येक चॅनलवर येत आहे असे मत मालिका व सिने दिग्दर्शक भीमराव मुडे यांनी व्यक्त केले. ३६४ क्र मांकाच्या अभिनय कट्टयावर डायरेक्टर्स व्ह्यूमध्ये मालिका व सिने दिग्दर्शक त्यांची मुलाखत घेण्यात आली. यावेळी कट्ट्याचे प्रमुख किरण नाकती यांनी त्यांना अनेक प्रश्न विचारुन बोलते केले. त्यांच्या मुलाखतीतून त्यांचा आतापर्यंतचा दिग्दर्शकीय प्रवास रसिकांना अनुभवता आला.
एखाद्या कलाकाराला यश मिळाल्यानंतर त्याने हे यश संपादन करण्यासाठी काय कष्ट घेतले हे पाहणे अधिक महत्वाचे आहे. शिकण्यासारखी गोष्ट आधी असते आणि तो इतिहास असतो म्हणून इतिहास अभ्यासला जावा. ग्लॅमर म्हणून अभिनयाच्या क्षेत्रात येण्यापेक्षा प्रेक्षकांच्या टाळ््या मिळविण्यासाठी या क्षेत्रात यावे. रुद्रम ही मालिका करण्यामागे दहा वर्षांचा इतिहास आहे आणि या इतिहासातून रंगभूमीशी प्रामाणिक राहणे, आपण केलेले काम परिपुर्ण होणे हे शिकलो. यावेळी त्यांनी क्राईम डायरीच्या गमती जमती सांगितल्या. या मालिकेमुळे रिअल लोकेशनवर शुट कसे करावे हे समजले. कोणतेही काम करताना आयुष्यात लाजू नका, काम हे काम असते ते छोटे वा मोठे नसते. मला नविन कलाकारांबरोबर काम करयाल जास्त आवडते. प्रस्थापित कलाकार हे नविन भूमिका करताना कसे दिसतील हे मला नविन कलाकारामधून कळते. आपले जगणे हे फास्ट फुड होत आहे. पुर्वी नाटकांचे विषय बंदिस्त घरांतील होते, आता मानवी भावनापर्यंत पोहोचले आहे. सुरूवातीला कट्ट्याच्या कलाकारांच्या कलाकृती सादर झाल्या. कार्यक्रमाचे निवेदन संकेत देशपांडे यांनी केले.